घड्याळाचे बटन दाबल्यावर कमळाला मत मिळाल्याचे मी प्रत्यक्षात पाहिले- पवार

घड्याळाचे बटन दाबल्यावर कमळाला मत मिळाल्याचे मी प्रत्यक्षात पाहिले- पवार

सातारा : ईव्हीएम मशीनमध्ये घड्याळाचे बटन दाबल्यावर कमळाला मत मिळते, हे मी प्रत्यक्षात पहिले आहे. त्यामुळे मला या प्रक्रियेची काळजी वाटत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज म्हणाले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

इव्हीएम यंत्राबाबत आपल्या वक्तव्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ईव्हीएम मशीनबाबत मला आता जास्त चिंता वाटत आहे. कारण, हैद्राबाद व गुजरात येथील तज्ज्ञांनी मला ईव्हीएम मशीनमध्ये घेटाळा करता येऊ शकतो हे प्रत्यक्ष दाखवले. मी स्वतः घड्याळाचे बटन दाबले तर कमळची लाईट लागली हे पाहिले असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले.

हे सर्व मशीनमध्ये करता येईल की नाही हे सांगू शकत नाही. परंतु त्यामुळे मला स्वतःला काळजी वाटत आहे. त्यामुळेच आम्ही न्यायालयात गेलो. 5 ऐवजी 50 टक्के मते मोजली जावी अशी विनंती केली. दुर्दैवाने आमची मागणी न्यायालयाने फेटाळली असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com