ज्योती क्रांती परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशन शरद पवार करणार मार्गदर्शन

राजकुमार शहा 
बुधवार, 11 जुलै 2018

मोहोळ : शाहु फुले आंबेडकरांचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे व सर्व जाती धर्माच्या भिंती पाडुन त्यांच्या अडचणी सोडविणे हा या ज्योती क्रांती परिषद स्थापनेचा उद्देश असून त्या बाबत सखोल मार्गदर्शन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार करणार असल्याची माहिती मोहोळचे नगराध्यक्ष तथा ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

येत्या 14 जुलैला या परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन मोहोळ येथे होत आहे. त्या कार्यक्रमाची रुपरेखेबाबत आयोजित पत्रकार परिषदेत बारसकर माहिती देत होते. सर्व जाती धर्माचा समावेश असलेल्या या परिषदेच्या पदाधिकाऱ्यात सर्व तरुणांना संधी दिली असून मराठवाडा, कोकण, विदर्भ, मुंबई या विभागात संघटना बांधण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली असल्याचे बारसकर यांनी सांगितले. यापूर्वी प्राथमिक चर्चेसाठी आपण मराठवाड्याचा दौरा केला असल्याचेही बारसकर यांनी सांगितले. 

राज्य अधिवेशनासाठी माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आ. अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री हसन मुश्रीफ, आण्णा डांगे, दिलीप सोपल, ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष बापुसाहेब भुजबळ, माजी खा. रणजीतसिंह मोहीते पाटील, आ. बबनदादा शिंदे, आ. हनुमंत डोळस राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे माजी आ. राजन पाटील जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते बळीराम साठे राष्ट्रवादीचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, खोखो असोशिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर, रश्मी बागल, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, राजुबापु पाटील पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी नियोजन व सत्कार समित्या गठीत केल्या आहेत नियोजन समितीत तेवीस जणांचा तर सत्कार समितीत एकोणीस जणांचा समावेश करण्यात आला आहे. आधिवेशनाची तयारी युद्धपातळीवर सुरू असुन ध्वनीक्षेपकावरुन गावोगावी नागरीकांना कार्यक्रमाला येण्याचे अवाहन करण्यात येत आहे.

Web Title: sharad pawar guides in jyoti kranton parishad state level meeting