चौकट सांभाळून आघाडी करा - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

कोल्हापूर - कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्र यावे, असा सूर सध्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे आघाडी करत असताना जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी चौकट सांभाळून आघाडी करावी. घराबाहेर जाऊन दुसऱ्याच्या घरात डोकावू नका, असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी कार्यकर्त्यांना दिला.

"पद्मविभूषण' सन्मान मिळाल्याबद्दल शरद पवार व त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांचा आमदार हसन मुश्रीफ व महापौर हसीना फरास यांच्या हस्ते कोल्हापूर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आज सत्कार झाला. या वेळी त्यांनी कोल्हापूरची मुक्‍तकंठाने प्रशंसा केली. पवार म्हणाले, 'कोल्हापूरचा सत्कार म्हणजे घरच्या लोकांनी केलेला सत्कार आहे. कोल्हापूरनंतर औरंगाबाद, नाशिक, पुणे या शहरांचा विकास बाहेरून आलेल्या लोकांमुळे झाला आहे. स्वबळावर गावाचा विकास करण्याची ताकद फक्‍त कोल्हापूरकरांमध्येच आहे.''

कॉंग्रेस हा राजकीय विचार
'कॉंग्रेस संपविण्याची भाषा काही मंडळी करत आहेत. कॉंग्रेस हा एक राजकीय विचार आहे आणि विचार कधी सांगून संपविता येत नाही. स्वातंत्र्याच्या लढ्यात कॉंग्रेसचीच मंडळी पुढे होती. कॉंग्रेसने देशासाठी प्राणांची आहुती दिली आहे. लोकशाहीच्या माध्यमातून सत्तेवर आलेले आणि कॉंग्रेस संपविण्याची भाषा करणारे लोक त्या वेळी कोठे होते? त्यांची नावेदेखील दिसत नाहीत. त्यामुळे कोणी कोणाला संपविण्याची भाषा करणे योग्य नाही,'' असे पवार म्हणाले.

Web Title: sharad pawar honor