...तर पायातील पायताण हातात घ्यावे लागेल: शरद पवार

 ...तर पायातील पायताण हातात घ्यावे लागेल: शरद पवार

पंढरपूर: दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सरकारने मदत करण्याची गरज आहे. परंतु सरकार निर्णय घेण्यास टाळाटाळ करत आहे. या नंतरही सरकारने टाळाटाळ केल्यास पायातील पायतान हातात घ्याव लागेल, असा गंभीर इशारा राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी दिला.

राज्यातील लोकसभा निवडणूकीची धामधुम काल संपताच लगेच राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील दुष्काळी गावांचा पाहाणी दौरा केला. यलमर मंगेवाडी येथील जनावरांच्या चारा छावणीत भेट देत येथील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

दौऱ्यानंतर दुपारी अजनाळे (ता.सांगोला) येथे त्यांनी शेतकर्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेलक्या शब्दात राज्य आणि केंद्र सरकारचा समाचार घेतला. पवार म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात दुष्काळी भागातील फळ बाग लागवडीसाठी आणि जतन करण्यासाठी मोठी मदत केली होती. त्यामुळेच अजनाळे सारख्या गावातील डाळिंब अनेक देशात निर्यात केले जाते. येथील शेतकरी रढत न बसता मोठ्या हिंमतीने दुष्काळी परिस्थितीवर मात करत कमी पाण्यात डाळिंबाचे उत्पादन घेतात. त्यांच्या जिद्दीचे कौतुक करावे तेवढं कमी आहे.

दुष्काळामुळे येथील अनेक वर्षाच्या बागा पाण्याअभावी जळू लागल्या आहेत. येथील डाळिंबाच्या बागा वाचवण्यासाठी राज्य सरकारने टँकरने पाणी देण्यासाठी व फळबाग लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान द्यावे अशी मागणी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन करणार असल्याचे ही यावेळी पवार यांनी सांगितले. दुष्काळामुळे शेतकरी संकटात आहे, अशा वेळी सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. सरकार मदत करणार नसेल तर आम्हाला सरकार विरोधात पायातील पायतान हातात घ्यावं लागेल. त्यानंतरच्या परिणामाला सरकारने तयार रहावं असे पवार यांनी सरकारला सुनावले. यावेळी आमदार गणपतराव देशमुख, आमदार भारत भालके, माजी आमदार दीपक साळुंखे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com