शरद पवारांना  चिंता ऊसदराची 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

सातारा - कारखान्यांना साखरेचे दर पडल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर देता आलेला नाही. तरीही सातारा जिल्ह्यातील कारखान्यांनी किती दर दिला, याची माहिती आज माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांकडून घेतली. जिल्ह्यातील काही कारखान्यांनी ठरल्याप्रमाणे पहिला हप्ता दिला असला, तरी सह्याद्री व जरंडेश्‍वरने सर्वाधिक दर दिल्याने त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. 

रयत शिक्षण संस्थेतील बैठका आटोपून पवार दुपारी शासकीय विश्रामगृहात आले. त्या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आमदार प्रभाकर घार्गे, सुधीर धुमाळ, राजकुमार पाटील, निवास शिंदे आदी उपस्थित होते. 

या वेळी कारखान्यांनी एफआरपी अधिक दोनशे रुपये दर देण्याचे जाहीर केले होते; पण साखरेचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे कारखान्यांना शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळता आलेला नाही. याबाबत शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. तरीही जिल्ह्यातील काही कारखान्यांनी अपेक्षित दर दिल्याचे रामराजे व शिवेंद्रसिंहराजेंनी सांगितले. 

भुईंजचा किसन वीर कारखाना अडचणीत का आला, याचीही त्यांनी माहिती घेतली. कऱ्हाडमधील सह्याद्री व कोरेगाव तालुक्‍यातील जरंडेश्‍वर कारखान्याला एफआरपी जास्त बसल्याने शेतकऱ्यांना त्यांनी चांगला दर दिल्याचे सांगताच श्री. पवार यांची आश्‍चर्य व्यक्त केले. न्यू फलटण शुगर अडचणीत असून त्याला मदत केली पाहिजे, असेही पवार यांनी सांगितले.

Web Title: Sharad Pawar worry about sugarcane prices