शाईहल्ल्यातील शर्मिलाने घेतली शरद पवारांची भेट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

नगर : अकोले येथे महाजनादेश यात्रेसाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर शाई फेकल्याबद्दल माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, त्या संदर्भात पोलिसांनी अजूनही मला नोटीस दिली नाही किंवा माझ्यावर कारवाई केलेली नाही. राष्ट्रवादीच्या अकोल्यातील सभेस मी उपस्थित राहणार आहे. तेथे मात्र पोलिसांकडून मला अटकाव होण्याची शक्‍यता आहे. ती होऊ नये, अशी कैफियत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी असलेल्या शर्मिला येवलेने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे मांडली.

येवले ही महाविद्यालयीन विद्यार्थिनी अकोले येथे मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शाई फेकल्यानंतर चर्चेत आली. अकोले येथील प्रश्‍न मांडून तिने भाजपमध्ये गेलेल्या आमदार वैभव पिचड यांच्या उमेदवारीला विरोध केला. पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर तिला अद्यापि कोणतीही नोटीस दिली नाही. याबाबत तिने सद्यःस्थिती पवार यांना सांगितली.

पिचड विरोधकांना सहकार्य
अकोले तालुक्‍यातील प्रश्‍न अनेक आहेत. मात्र, आमदार महागड्या गाड्या घेऊन मिरवत राहिले. पिचड यांच्या विरोधात कोणताही उमेदवार असेल, तर आम्ही त्यांना साह्य करू. अकोले येथे एकास एक उमेदवार देण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या सभेस जाण्यास मला पोलिसांकडून अटकाव होऊ शकतो. याबाबत मी शरद पवार यांना माहिती दिली असल्याचे शर्मिला येवले हिने "सकाळ'शी बोलताना सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharmila's meet to Sharad Pawar