Loksabha 2019 : भाजपचे 'गर्वाचे घर' मतदारांनीच खाली करावे: शत्रुघ्न सिन्हा

shatrughan sinha
shatrughan sinha

सोनई : "जुन्या-जाणत्या नेत्यांच्या कष्टातून भारतीय जनता पक्षाने केंद्राची सत्ता मिळवली होती; मात्र मतदारांनी दिलेल्या संधीनंतर नम्रतेऐवजी या सरकारला गर्व चढला. पुन्हा सत्तेवर येण्यासाठी या सरकारचा सध्या आटापिटा सुरू आहे. आगामी निवडणुकीत मतदारांनीच त्यांचे "गर्वाचे घर' खाली करावे,'' अशी प्रतिक्रिया अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केली. 

सिन्हा यांनी रविवारी पत्नी पूनमसह शनिशिंगणापूरला भेट देऊन स्वयंभू शनिमूर्तीचे दर्शन घेतले. उदासी महाराज मठात त्यांनी सपत्नीक अभिषेकही केला. या वेळी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी त्यांच्यासोबत "सेल्फी' घेण्याची संधी साधली. जनसंपर्क कार्यालयात देवस्थानाचे विश्वस्त दीपक दरंदले यांनी शाल, श्रीफळ व प्रसाद देऊन त्यांचा सत्कार केला. 

सत्कारानंतर सिन्हा यांनी उपस्थित पत्रकार व भक्तांशी मनमोकळेपणे संवाद साधला. सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत ते म्हणाले, ""भारतीय जनता पक्षात जे अनेक वर्षे "हीरो' होते, त्यांना या निवडणुकीत "झीरो' करण्यात आले. मी कायमच राष्ट्रहिताला अग्रक्रम दिला. व्यक्तिपूजा अजिबात केली नाही आणि करणारही नाही. पक्षातील जसवंतसिंह, अरुण शौरी, यशवंत सिन्हा, मुरलीमनोहर जोशी आणि आता लालकृष्ण अडवानी यांना दिलेली वागणूक नक्कीच अपमानास्पद आहे. याची किंमत भारतीय जनता पक्षाला चुकवावीच लागेल.'' 

शालिनी लांडे, नितीन शेटे, राजेंद्र लांडे सत्कारप्रसंगी उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले यांनी देवस्थानाच्या विकासकामांची माहिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com