सोलापूरसह आठ जिल्ह्यांत शेळ्या-मेंढ्यासाठी छावण्या

सोलापूरसह आठ जिल्ह्यांत शेळ्या-मेंढ्यासाठी छावण्या

सोलापूर : सोलापूरसह राज्यांतील आठ जिल्ह्यांमध्ये शेळ्या-मेंढ्यासाठी छावण्या सुरु करण्याचा अध्यादेश महसूल व वन विभागाने आज शुक्रवारी जारी केला. दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत शेळ्या-मेंढ्यासाठी छावण्या सुरु करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने 28 मे रोजी घेतला होता. त्यानुसार आज अध्यादेश जारी करण्यात आला आहे.

सोलापूरसह सातारा, सांगली, उस्मानाबाद, बीड, जळगाव, पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यात या छावण्या सुरु करण्यात येणार आहेत. शेळ्या-मेंढ्यांना चारा व पाणी उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने छावण्या उघडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

छावणीत दाखल झालेल्या प्रती शेळी व मेंढीसाठी प्रत्येकी पंचवीस रुपये अनुदान दिले जाणार आहे. पशुपालकांना
छावणीत शेळ्या-मेंढ्या दाखल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे बंधन टाकण्यात आलेले नाही. मात्र, शेळ्या-मेंढ्यांच्या
संरक्षणासाठी शेळ्या-मेंढ्यांच्या मालकांनी संरक्षण जाळे आणणे आवश्यक आहे.

छावणीतल्या प्रत्येक शेळी-मेंढीला प्रतिदिन तीन ते चार लिटर स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. हिरव्या चाऱ्यात उसाचे वाडे किंवा उस देऊ नये. हिरवे वैरण उपलब्ध नसल्यास प्रति शेळी-मेंढी दोन किलोग्रॅम मुरघास द्यावे, असे या संदर्भातील आदेशात म्हटले आहे.

असे दिले जाईल प्रती शेळी-मेंढी चारा

हिरवा चारा           तीन किलोग्रॅम
वाळलेला चारा         एक किलोग्रॅम
पशुखाद्य (दिवसाआड)   200 ग्रॅम.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com