शेटफळे प्रादेशिक योजना बंद, भीषण पाणी टंचाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

आटपाडी - शेटफळे प्रादेशिक योजना बंद झाल्यामुळे शेटफळेत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून काहीनी एकत्र येऊन गावात मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यांच्या लोकांना आधार मिळाला आहे.

शेटफळे प्रादेशिक योजनेची मोटर बंद आहे. ती दुरुस्तीसाठी प्रादेशिक योजनेकडे पैसे नाहीत. तर ग्रामपंचायत थकबाकी  भरत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा बंदच आहे. या दोघांच्या वादात ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल सूरू आहेत. त्यामुळे लोकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. 

पाणी टंचाईवर उपाय म्हणून सरपंच रेश्मा शिरसागर, माजी चेअरमन आनंदराव गायकवाड आणी सेवानिवृत शिक्षक किसनराव  गायकवाड यांनी स्वखर्चाने टँकर सुरू केला आहे. या टँकरद्वारे लोकांना मोफत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सूरू केला आहे. जोपर्यंत नळाला पाणी येत नाही, तोपर्यंत गावात टँकरने मोफत पाणी वाटप केले जाणार आहे.           

Web Title: Sheetfale closed the regional plan of water