मंगळवेढा : शेतकरी संघटनेचे नेते, कार्यकर्ते ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

मंगळवेढा : भारतीय जनता पार्टी स्वाभिमानी रयत क्रांती शिवसेना रिपाई मित्र पक्षाचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवेढा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मतदारसंघ अध्यक्ष व काही माजी सैनिकांना ताब्यात घेतले आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटना मतदारसंघ अध्यक्ष राहुल घुले यांच्या निवासस्थानावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यासमवेत शहरातील काही प्रमुख माजी सैनिकांना देखील ताब्यात घेतले आहे.

ग्रामीण भागातील काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेली असल्याचे समजते दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा आंदोलन करण्याचा किंवा कृतीचा इशारा दिला नसताना ही कारवाई केल्यामुळे त्यांच्यातून नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.

आम्ही कोणत्याही प्रकारचे आंदोलन व काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला नसताना देखील सरकार हुकूमशाही पद्धतीने पोलीसाच्या माध्यमातून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु हा आवाज दाबता हा आवाज जनतेच्या व मतपेटीच्या माध्यमातून वाढणार आहे.- अॅड राहुल घुले, अध्यक्ष पंढरपूर विधानसभा मतदारसंघ
 
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून काही माजी सैनिक व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही त्यांना आदराची वागणूक दिली जाणार आहे.- दत्तात्रेय पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shetkari sanghtna party workers arrested in Mangalwedha