शेवगावात कांद्याला साडेतीन हजार भाव!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

शेवगाव - बाजार समितीत आजच्या लिलावात चांगल्या प्रतीच्या कांद्याला पस्तीसशे रुपये क्विंटल असा उच्चांकी भाव मिळाला. मागील चार वर्षांतील हा सर्वाधिक भाव आहे.

शेवगाव - बाजार समितीत आजच्या लिलावात चांगल्या प्रतीच्या कांद्याला पस्तीसशे रुपये क्विंटल असा उच्चांकी भाव मिळाला. मागील चार वर्षांतील हा सर्वाधिक भाव आहे.

लिलावात आज कांद्याला सरासरी 2100 ते 3500 रुपये क्विंटल भाव मिळाला. बाजार समितीत आज कांद्याची साडेचार ते पाच हजार गोण्या आवक झाली. गेल्या वर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेतले. कमी भावामुळे अनेकांनी कांदा साठवून ठेवला होता.

वांबोरीत सत्तावीसशे भाव
राहुरी - बाजार समितीच्या वांबोरी उपआवारात आज कांद्यास क्विंटलला दोन हजार 700 रुपये भाव मिळाला. मागील लिलावापेक्षा क्विंटलला 500 रुपयांनी वाढ झाली. उपबाजारात आज 12 हजार क्विंटलची आवक झाली.

Web Title: shevgav nagar news 3500 onion rate