कोल्हापूर येथे शिक्षणाची वारी उपक्रम (व्हिडिआे)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

कोल्हापूर - ‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने चाकोरीबाहेरील ज्ञानाची कक्षा रुंदवावी व त्यातून प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करावा,’ असे प्रतिपादन राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी केले.

कोल्हापूर - ‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने चाकोरीबाहेरील ज्ञानाची कक्षा रुंदवावी व त्यातून प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करावा,’ असे प्रतिपादन राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी केले.

कोल्हापूर येथे शिक्षण वारीच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘प्रत्येक इयत्तेतील अध्ययन निष्पत्ती साध्य होण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. राज्यातील एकही मुलगा अप्रगत राहू नये, असा आदर्श शिक्षकांनी उभा करावा. विद्यार्थ्यांच्या भावी जीवनाच्या दृष्टीने शिक्षक हा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. याची जाणीव शिक्षकांनी ठेवून काम करण्याची गरज आहे.’’

मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल म्हणाले, ‘‘गुणवत्तेसाठी शिक्षणाची वारी ही एक संधी आहे. या वारीतील उपक्रम  शाळेपर्यंत पोचवावेत. काही शाळांतून स्वयंस्फूर्तीने गुणवत्तापूर्ण काम झाले आहे. अशा शाळांना जिल्हा परिषदेच्या वतीने आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करीन. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍याच्या भौगोलिक परिस्थितीत विविधता आहे, तरीही येथील शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे.’’

विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी स्वागत केले. शालेय शिक्षणमंत्री विभागाच्या विशेष कार्यअधिकारी प्राची साठे, पुणेचे उपसंचालक शोभा खंदारे, प्राचार्य डॉ. आय. सी. शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, कमलादेवी आवटी, असिफ शेख, दयानंद जेटनुरे, डॉ. विकास सलगर उपस्थित होते. माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी आभार मानले.

Web Title: Shikshanwari in Kolhapur