शिक्षणवारीची सांगता (व्हिडिआे)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

फुलेवाडी -  कोल्हापूर येथील तपोवन मैदानात आयोजित केलेल्या शिक्षणाच्या वारीत तीन दिवसांत सुमारे २० हजार शिक्षक व शिक्षणप्रेमींनी भेट दिली. सात जिल्ह्यांतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षणप्रेमी लोकांनी वारीतील स्टॉलला भेट देऊन शिक्षकांनी राबवलेल्या विविध प्रयोग व उपक्रमांची माहिती घेतली. वारीची आज सांगता झाली.

शालेय शिक्षण विभागातर्फे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत या वारीचे आयोजन केले होते. वारीच्या सांगता समारंभप्रसंगी भक्ती सेवा विद्यापीठाचे चेअरमन ॲड. धनंजय पठाडे म्हणाले, ‘‘वारीतील ज्ञानाची गंगा वाहती राहावी. तपोवन मैदानात वारीच्या रूपाने ज्ञानवंतांचा मेळावा फुलल्याचे गौरवोद्‌गार त्यांनी काढले.’’

विविध ५२ स्टॉल
पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यातील शिक्षक व पालक यांनी वारीचा लाभ घेतला. वारीत सुमारे ५२ स्टॉलची मांडणी केली होती. हे स्टॉल महाराष्ट्राच्या विविध भागांतील तंत्रस्नेही शिक्षकांनी मांडले होते.

या वेळी उपसंचालक शोभा खंदारे, मुंबईचे समन्वयक अंकुश बोबडे, दत्तात्रय वाडेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, शिक्षण निरीक्षक डी. एस. पोवार, एस. के. यादव, नीता करवंजे, पल्लवी चिंचोळकर, डॉ. सुरेश माने, तुकाराम कुंभार, संजय लोंढे, राजेंद्र पाटील, प्रदीप मगदूम, अनुराधा चव्हाण उपस्थित होते. संदीप मगदूम व सविता कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. आय. सी. शेख यांनी आभार मानले.

Web Title: Shikshanwari in Kolhapur