शिंपी, केसकर यांचे शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

आजरा - जिल्हा परिषदेसाठी आज जयवंतराव शिंपी व हिराबाई विष्णुपंत केसरकर यांनी आज शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. जिल्हा परिषदेसाठी चार; तर पंचायत समितीसाठी 13 अर्ज दाखल झाले. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा चौथा दिवस असल्याने निवडणूक कार्यालयासमोर मोठी गर्दी होती.

जयवंतराव शिंपी यांनी आजरा जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केला. याच गटात समीर इस्माईल चॉंद, अमानुल्ला हुसेन आगलावे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. कोळिंद्रे जिल्हा परिषदेसाठी आजरा पंचायत समितीचे विद्यमान सभापती विष्णुपंत केसकर यांच्या पत्नी हिराबाई विष्णुपंत केसरकर यांनी अर्ज दाखल केला.
जयवंतराव शिंपी यांनी रवळनाथ मंदिरात नारळ ठेवला. शिवाजी पुतळ्यापासून समर्थकांची रॅली निघाली. यामध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई, भिकाजी गुरव, सुधीर देसाई, रशीद पठाण, एम. के. देसाई, शामराव बोलके, रणजित देसाई, उपसभापती दीपक देसाई, मसणू सुतार, आदमसाहब माणगावकर, सदाशिव जाधव, राजू होलम, बशीर खेडेकर, गुलजार पटेल, ऍड. लक्ष्मण गुडूळकर, सुभाष देसाई, आप्पासाहेब देसाई, विलास पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. हिराबाई केसरकर यांनी समर्थकांसह अर्ज दाखल केले. या वेळी संभाजी पाटील, राजेंद्र सावंत, देवराज माडभगत, युवराज पोवार, विजय देसाई, पांडू देसाई, गुणाजी धडाम, शंकरराव बुगडे, सदानंद देसाई, संभाजी चव्हाण, धोंडिबा गिलबिले, अमृतराव देसाई, बाळासाहेब मगदूम, सुरेश करडे, तुकाराम यादवडे, सुरेश करडे, बाबूराव निउंगरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Shimpi, Keskar filled form