मंगळवेढ्यात भालके अन् काळुंगेंच्या श्रेयवादाच्या लढाईत शिंदेंचे खच्चीकरण

मंगळवेढ्यात भालके अन् काळुंगेंच्या श्रेयवादाच्या लढाईत शिंदेंचे खच्चीकरण

मंगळवेढा : सत्ताधारी भाजपाने महाराजांच्या रूपाने उमेदवार निश्चित केला असला तरी काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना मंगळवेढ्यातून मताधिक्यासाठी आमदार भालके व काळुंगे गटात होणाऱ्या श्रेयवादाच्या लढाईत दोन्ही गटाकडून शिंदेचेच खच्चीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, मोहिते पाटीलाच्या भाजप प्रवेशानंतर तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार पडले असून याचा फटका पर्यायाने शिंदे यांना बसणार असल्याने पण यावर शिंदेच काय तोडगा काढतात याकडे लक्ष लागले आहे.

तालुक्यातील काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता निर्माण करण्यात स्व मारवाडी वकीलांनी निवडणूक खर्चातील शिल्लक पैसे परत करून पक्ष वाढीचे काम चांगले केले त्याच्या पश्चात तालुक्यातील धुरा शिवाजी काळूगे, इन्नुस शेख, हरी यादव, यादाप्पा माळी, अर्जुन पाटिल, अविनाश शिंदे, भिवा दोलतोड़े ,महादेव कोरे, यांच्याकडे आली त्यांनी काँग्रेस वाढवत कार्य करत राहिले. मात्र मतदार संघ पुनर्रचनेत बऱ्याच घडामोडी घडल्या. काहीनी पक्षाचा फायदा स्वहितासाठी करून घेतला तर काही आत्मनिर्भर होऊन पक्षाची कावड़ खाली ठेवत आपले वजन वाढवत पक्षाला बाजूला ठेवले. 2014 साली भालके हे काँग्रेसवासी झाल्यापासून मूळ काही काँग्रेसवासी नेत्यांनी अलगदपणे पक्षाची झूल बाजूला ठेवत. दुरावलेल्या मंडळीपैकी अनेक जण परिचारक यांच्या संपर्कात असल्याने यामुळे परिचारक यांनी जर त्यांना भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मदतीचे आवाहन केले तर, यात ही मंडळी कोणती भूमिका घेणार? यात विशेषता काळुंगे गटासह अन्य गट काय करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले. तर काॅग्रेस उमेदवार शिंदे हे गेल्या सहा महिन्यांपासून तालुक्यात विविध कार्यक्रमासाठी हजेरी लावत रड्डेच्या मेळाव्यातून निवडणूकीचे संकेत दिले.

तालुक्यांमध्ये शिंदेची कावड खांद्यावर घेऊन काँग्रेसचं झेंडा ग्रामीण भागात फिरवण्याचे काम करणाय्रा शिवाजी काळुंगेचा धनश्री परिवार मोठा आहे गेल्या पाच वर्षात त्यांच्या परिवाराचा पसारा वाढला आहे मात्र लोकसभेसाठी शिंदेना पाठिंबा देत त्यांचा प्रचार करण्याव्यतिरिक्त काँग्रेससाठी पाच वर्षाच्या काळात कोणत्याही निवडणुकीला सामोरे न जाण्याच्या भूमिकेमुळे भालके गटातील कार्यकर्त्यांमध्ये अशा संधी साधू राजकीय विचारसरणी विरोधात अस्वस्थता निर्माण झाली असून जर काळुंगे गटाने काँग्रेसच्या प्रचारार्थ मैदानात उतरून प्रचार यंत्रणा सुरू केली तर, त्या त्या भागातील भालके समर्थक हे बघ्याची भूमिका घेणार असल्याचे चर्चा तालुक्यात दबक्या आवाजात होत असून प्रचारासाठी अत्यंत कमी कालावधी राहिला आहे. 

या कालावधीमध्ये शिंदे यांच्या पुरता काँग्रेसमधील बाहेरून पाठिंबा असणाऱ्या गटाला काँग्रेसची ध्येयधोरणे नव्याने शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे. शिंदेचे 25 वर्षातील काम आणि भाजपा सरकारने दिलेल्या आश्वासनावर काढलेल्या होय आम्ही करून ही पत्रके अजून मतदारापर्यंत पोहचली नाहीत तरीही, जिल्हाध्यक्ष पाटील याला या मतदारसंघात प्रतिसाद मिळाल्याचा दावा करत आहेत. आ. भालके काँग्रेसमध्ये आल्यापासून दुखावलेली काँग्रेसची मंडळी सध्या काँग्रेस पासून अंतरावर आहेत त्यांना देखील शिंदे यांनी रिचार्ज करणे आवश्यक आहे. अन्यथा या मंडळीचे गप्प बसणे देखील विरोधी पक्षांना एक प्रकारचे सहकार्य असल्याची चर्चा नागरिकातून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com