शिराळा नगरपंचायतीत येणार महिला राज 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

शिराळा - शिराळा नगरपंचायतीतील 17 पैकी 9 प्रभागांत महिला निवडून येणार आहेत. नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांना मिळणार आहे. त्यामुळे तीन प्रभागांत रस्सीखेच आहे. नगरपंचायतीची पहिली नगराध्यक्षा महिला होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. 

योगायोगाने 28 महिला व 28 पुरुष असे 56 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नगरपंचायतीत फिफ्टी फिफ्टीचा खेळ सुरू आहे. मैत्रिणींच्या प्रचारासाठी महिलांनी सांसारिक दिनचर्येचे वेळापत्रक बदलून प्रचाराची पताका हाती घेतली आहे. चुलीपर्यंत जाऊन महिला उमेदवाराच्या चिन्हाची छबी मतदारांच्या मनावर उमटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

शिराळा नगरपंचायतीची स्थापना झाली त्यावेळी नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी सर्वांनीच गुडघ्याला बाशिंग बांधले. अनेक युवकांनी वाढदिवस ठरवून उत्साहात साजरे करण्यास सुरवात केली. परंतु आरक्षणाचा फटका बसल्याने अनेक प्रभागांत इच्छुकांच्या दांड्या गूल झाल्या. महिला आरक्षणामुळे नगराध्यक्षपदाचे स्वप्न पाहणाऱ्यांची झोप उडाली. प्रभाग 4, 6, 15 या प्रभागांतून निवडून येणाऱ्या उमेदवारांपैकी एकीला नगराध्यक्षपद मिळणार आहे. प्रभाग चारमधून चित्रा दिवटे, राजश्री यादव, रंजना यादव प्रभाग सहामधून सीमा कदम, रहीमतली मुल्ला, ज्योती शेटे ; प्रभाग 15 मधून राणी चव्हाण, स्नेहल जाधव, ऍड. नेहा सूर्यवंशी ह्या लढत आहेत. उच्चशिक्षित  महिलांचा समावेश आहेत.

Web Title: Shirala Nagar Panchayat will come in women's Secrets