चांदोलीत सलग तीन दिवस अतिवृष्टी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जुलै 2017

शिराळा - गेले आठ दिवसांपासून शिराळा तालुक्‍यात पावसाची संततधार कायम आहे. धरण परिसरात सलग चार दिवस अतिवृष्टी झाली असून २४ तासांत ७७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

शिराळा तालुक्‍यातील पाझर तलावातील पाणीसाठ्यात  वाढ झाली असून शिंदेवाडी येथील पाझर तलाव भरल्याने सांडव्यातून पाणी बाहेर पडले आहे. वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून गेले तीन दिवसांपासून मांगले -काखे पूल व मांगले-सावर्डे, कोकरूड-रेठरे, पुनवत-  माणगाव हे बंधारे पाण्याखालीच आहेत. 

चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. आज २४ तासांत ७७ मि.मी. पाऊस झाला असून एकूण १२८० मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. पाणी पातळी ६१७.३० मीटर, तर पाणीसाठा ७३१.९०३ दशलक्ष घनमीटर आहे.२५.८५ टी.एम.सी.म्हणजे ७५.१३ टक्‍के पाणीसाठा झाला आहे.

Web Title: shirala news three days heavy rain in chandoli