सोलापूर - शिरापूर-एकरुख योजना रखडणार 

तात्या लांडगे
शनिवार, 9 जून 2018

सोलापूर : जिल्ह्यातील शिरापूर व एकरुख योजनेतून 38 हजार 780 हेक्‍टर क्षेत्राची सिंचनक्षमता निर्माण होणार आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी आतापर्यंत 239 कोटी रुपये खर्च झाले आहेत. या प्रकल्पांच्या उर्वरित कामांसाठी 23 एप्रिल 2018 च्या बैठकीत शासनाकडून सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. परंतु, त्याबाबतचे पत्र अद्यापही मिळालेले नाही. 

शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या जोड कालव्यातील लघू वितरिकेची उर्वरित कामे बंद पाइपलाइनद्वारे करण्याचे प्रस्तावित आहे. अद्यापही ते काम हाती घेण्यात आलेले नाही. तसेच वितरिकांसाठीच्या 370 हेक्‍टर क्षेत्राचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून संकल्पन व सर्वसाधारण आराखडा मान्यतेसाठी महामंडळ कार्यालयास सादर करण्यात आला. आता त्यातील त्रुटी दुरुस्तीचे काम सुरू आहे. एकरुख उपसा सिंचन योजनेच्या होटगी वितरिकेची निविदेची कार्यवाही पूर्ण झाली असून उर्वरित वितरण व्यवस्थेची कामे बंद पाइपलाइनद्वारे करण्याचे प्रस्तावित असून त्याचे काम शिल्लक आहे. 

एकरुख उपसा सिंचन योजनेंतर्गत या वर्षात 30 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद असून त्यातून सुमारे पाच हजार हेक्‍टर सिंचनक्षमता निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच शिरापूर उपसा सिंचन योजनेंतर्गत 10 कोटींचा निधी प्रस्तावित केला असून त्यातून एक हजार हेक्‍टर सिंचनक्षमता निर्माण होणार असल्याचे लघू पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. 

आकडे बोलतात... 
शिरापूर उपसा सिंचन 
सध्याची किंमत 
474.51 कोटी 
झालेला खर्च 
100.51 कोटी 
2018-19 साठी तरतूद 
10 कोटी रुपये 
आवश्‍यक भूसंपादन 
409.26 हेक्‍टर 
झालेले भूसंपादन 
143.54 हेक्‍टर 
सध्याची अडचण 
प्रमाणापेक्षा अधिक खर्च करण्यास शासनाची परवानगी हवी 
........ 
एकरुख सिंचन योजना 
सध्याची किंमत 
412.80 कोटी 
झालेला खर्च 
138.65 कोटी 
2018-19 साठी तरतूद 
30 कोटी रुपये 
आवश्‍यक भूसंपादन 
461.73 हेक्‍टर 
झालेले भूसंपादन 
173.69 हेक्‍टर 
सध्याची अडचण 
कारंबा पंपगृहाचे काम पूर्ण करण्याची गरज

Web Title: shirapur ekrukh scheme is getting on delay in solapur