"मातंग समाजाला 5 टक्के आरक्षण द्या' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

शिर्डी - मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात पाच टक्के आरक्षण मिळावे. तसेच लोकसभा, विधानसभा व अन्य सर्व निवडणुकांतील उमेदवारीत विविध राजकीय पक्षांनी मातंग समाजाला पुरेशा प्रमाणात प्रतिनिधित्व द्यायला हवे, असे मत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी आज व्यक्त केले. 

मातंग ग्रुप डेव्हलपमेंट चळवळीतर्फे आयोजित स्नेहसंमेलनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू रमेश आवळे होते. माजी मंत्री रमेश बागवे, माजी खासदार संदीपान थोरात आदी या वेळी उपस्थित होते. माजी मंत्री बागवे म्हणाले, ""राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण या कार्यक्रमात सहभागी झालो. मातंग ग्रुप डेव्हलपमेंटने समाजास हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून, समाजाला सक्षम करण्याचे काम त्या माध्यमातून सुरू केले आहे.'' 

Web Title: shirdi news give 5 percent reservation to Matang community