म्हैसाळ उपसा सिंचनयोजनेतून शिरनांदगी तलाव त्वरीत भरून द्यावा - प्रा.येताळा भगत 

हुकूम मुलाणी
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

मंगळवेढा - ऐन पावसाळ्याचे अडीच महिने संपले तरी  तालूक्यात पावसाने ओढ दिल्याने पेरणी केलेल्या खरीप पिकानी माना केव्हाच टाकल्या आहेत. उजनी कालव्यातून पाणी सूटल्यामूळे छत्तीस गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे. परंतु, मंगळवेढा तालूक्यातील म्हैसाळ प्रकल्पांतर्गत गावासाठी  ऑगस्टअखेर शिरनांदगी तलावात पाणी सोडावे अन्यथा शिवसेनेच्या वतीने हून्नूर येथील बिरोबाच्या मंदीरात ठिय्या आंदोलन करून शिरनांदगी तलावातील पाण्याचे पूजन करूनच बिरोबाला त्याच पाण्याने अभिषेक घालूनच आंदोलन थांबवणार असल्याचे परिपत्रक शिवसेना तालूकाप्रमूख प्रा. येताळा भगत यांनी प्रसिध्द केले आहे.

यामधील रेवेवाडी हून्नूर महमदाबाद लोणार पडोळकरवाडी मारोळी लवंगी सलगर खू॥ व बू॥ शिरनांदगी पौट बावची चिक्कलगी जंगलगी आसबेवाडी शिवणगी सोड्डी रड्डे निबोणीं हून्नूर या गावातील जनता म्हैसाळ उपसा सिंचन योजनेकडे डोळे लावून बसली. म्हैसाळ योजनेचे प्रकल्पिय कामाचा कालावधी संपला तरी मोठ्या प्रमाणात काम अपूर्ण आहे. यामूळे या भागातील 10000 हेक्टर जमिनीस हक्काचे पाणी मिळत नाही, तूलनेने सांगोला व जत तालूके दूष्काळमूक्त होण्याच्या मार्गावर आहेत. मंगळवेढा तालूक्यातील पाणी येण्याचा मार्ग खूपच खडतर होत आहे. अजून किती दिवस शांत बसून बघावे लागणार? तरूणपिढी राजकर्त्यास माफ करणार का? शिरनांदगी तलावामध्ये जूलैअखेरपर्यंत पाणी सूटण्याच्या वल्गना झाल्या पण पाणी सूटण्यामध्ये अपूय्रा कामाची मोठी अडचण आहे. म्हैसाळच्या अधिकाय्राला साक्षी ठेवून आमदारसाहेबानी पत्रकारपरिषद घेवून जूलैअखेरपाणी सूटणाय्रा कॅनालची क्षमता खूपच कमी असून तलाव भरेपर्यंत मागे कॅनाल चालू ठेवून पाणी परवडणार नाही. प्रकल्पिय काम अपूरे असल्याने आमच्या वाट्याचे एक टीएमसी पाणी कर्नाटकमध्ये वाहून जात आहे. शिरनांदगी तलावाच्या ओढ्यावरच जत कॅनालच्या जलसेतूचे काम चालू आहेव त्याच कॅनालच्या किमी 65 मध्ये सीआर गेटटाकून ओढ्यामध्ये पाणी टाकण्यासाठी एसकेएफचीही व्यवस्थाही पूर्ण आहे. व याठिकाणी कॅनाल वहन क्षमता जवळपास 350 क्यूसेक्स आहे. या ओढ्यावर येळवी तलाव ता, जत  हंगीरगे तलाव ता सांगोला रेवेवाडी हून्नूरमार्गे शिरनांदगी तलावात सोडून दूष्काळाची तीव्रता कमी करता येईल यामूळे शिरनांदगी रड्डे चिक्कलगी निंबोणी भागातील पिकाना जिवदान मिळणार आहे. याबाबत मूख्यमंत्री जलसंपदा मंत्री खा.संजयकाका पाटील.आ. भाई गणपतराव देशमूख, जतचे आ. विलास जगताप यांना भेटून याबाबतचे निवेदन देण्यात येणार आहे.

Web Title: shirnandgi lake has to be filled for farmers