जय शिवाजी अन्‌ शिवकालीन युद्धकलेचा थरार...! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

कोल्हापूर - "जय भवानी-जय शिवाजी'चा अखंड जयघोष आणि शिवकालीन युद्धकलेच्या थराराने आज मिरजकर तिकटी चौक रोमांचित झाला. पंधराहून अधिक युद्धकला केंद्राच्या मावळ्यांनी मर्दानी खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. निमित्त होते, मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळातर्फे आयोजित शिवजयंती उत्सवाचे. दरम्यान, शहर आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणी आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. 

ओम गणेश मर्दानी आखाडा, अवधूत पंत मर्दानी आखाडा, (कै) सुहासराजे ठोंबरे मर्दानी आखाडा, शंभूराजे मर्दानी आखाडा, झुंजार मर्दानी खेळ पथक, उत्तरेश्‍वर मर्दानी खेळाचा आखाडा, हिंद प्रतिष्ठान, शांतिदूत मर्दानी आखाडा, न्यू छत्रपती ब्रिगेड आखाडा, राजमाता जिजाऊ मर्दानी आखाडा, क्रांतिवीर फिरंगोजी मर्दानी खेळाचा आखाडा, मर्दानी राजा सुहास ठोंबरे आखाडा, संयुक्त जुना बुधवार मर्दानी खेळाचा आखाडा, नंगीवली मर्दानी खेळ आखाडा आणि चंद्रे येथील मर्दानी खेळाचा आखाडा आदी आखाड्यांतील मावळ्यांनी एकाहून एक सरस युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर केली. त्यामध्ये लाठी, पट्टा, पट्टा बंदाटी, फरी गदका, बाणा, भाला, तलवार, विटा, लिंबू काढणी आदी युद्धकला प्रकारांचा समावेश होता. मंडळाचे अध्यक्ष बाबूराव चव्हाण, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, रमेश मोरे, रमेश पाटील, केशव चेंडके, अजिंक्‍य साळोखे, प्रसाद खोराटे, सुशांत चव्हाण, राहुल कुलकर्णी, बाळासाहेब पाटील, बाबासाहेब लबेकरी, अशोक पोवार, जयकुमार शिंदे, राजेंद्र पाटील, अच्युत साळोखे आदींच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाला प्रारंभ झाला. दरम्यान, उद्या (ता. 24) सायंकाळी साडेपाचला शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्‍तृत्व स्पर्धा होणार आहेत. 

आजही विविध कार्यक्रम 
शहरातील संयुक्त जुना बुधवार पेठेच्या वतीने तोरस्कर चौक येथे शिवजयंती उत्सवाला प्रारंभ झाला आहे. संयुक्त उत्तरेश्‍वर शिवजयंती उत्सव समितीतर्फे आज (ता. 24) "चला, चिमण्या व पक्षी वाचवू या' या कार्यक्रमाने उत्सवाला प्रारंभ होईल. पापाची तिकटी येथील दत्त महाराज तालीम मंडळातर्फे आज (ता.24) सायंकाळी सहा वाजता शिवमूर्ती आगमन सोहळा होईल. 

Web Title: Shiv Jayanti Festival

टॅग्स