नगर महापालिकेत शिवसेनाच ठरला 'वाघ'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

महापालिकेच्या या निवडणुकीमध्ये सर्वेक्षणाचे अंदाज फोल ठरवीत नगरकरांनी शिवसेनेला सर्वाधिक पसंती या निवडणुकीत दिली. केडगावमधील भाजपात प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

नगर - महापालिका निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात असून, सुरुवातीच्या दिड वाजेपर्यंत हाती आलेल्या ट्रेंडनुसार नगरकरांनी शिवसेनेला सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसते.

दुपारपर्यंतच्या आकडेवारीत शिवसेनेला 22, राष्ट्रवादी काँग्रेसला 20, भारतीय जनता पार्टीला 14, काँग्रेसला पाच आणि बहुजन समाज पार्टीला नगरमध्ये 4 जागांवर आघाडीवर आहे. महापालिकेच्या या निवडणुकीमध्ये सर्वेक्षणाचे अंदाज फोल ठरवीत नगरकरांनी शिवसेनेला सर्वाधिक पसंती या निवडणुकीत दिली. केडगावमधील भाजपात प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

त्यातही विजयाचे शिल्पकार असलेल्या शिवसेनेच्या शहरप्रमुख दिलीप सातपुते यांना मात्र अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान भारतीय जनता पार्टीचे महापौरपदाची प्रमुख दावेदार सुरेंद्र व त्यांच्या पत्नी दिप्ती गांधी यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.

निकालाचे वृत्त जसजसे हाती येत गेले तसतसे मतमोजणी कक्षातून बाहेर पडणाऱ्या कार्यकर्त्यांनी गोंधळाला सुरुवात केली. जल्लोषात मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांवरही गुलाल टाकण्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांनी गोंधळ घालणार्‍या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. त्यामुळे कार्यकर्त्यांची मोठी पळापळ झाली. यात काही दुचाकींची मोडतोडही झाली. मतदान कक्षाबाहेर घडली. अनेक कार्यकर्ते चपला सोडून पळाले.

एकूण 68
भाजप - 14
शिवसेना - 24
राष्ट्रवादी - 18
कॉंग्रेस - 5
बसप - 4
सपा - 1
अपक्ष - 2

Web Title: Shiv Sena is ahead in municipal corporation election