महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार...सांगलीत जल्लोष

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

भगवा झेंड्यासह राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे झेंडे एकत्र घेऊन कार्यकर्ते जमल्याचे चित्र प्रथमच पहायला मिळाले. जोरदार घोषणाबाजी करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. पुतळ्यासमोर येऊन "महाराष्ट्राचा बुलंदआवाज शरद पवार..शरद पवार', "आता कसं वाटतंय..गोड-गोड वाटतंय' अशा घोषणांनी बसस्थानक परिसर दणाणून सोडला.

सांगली -  राज्यात बहुमत चाचणीपूर्वीच भाजपचे सरकार पायउतार झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याबद्दल आज येथे जल्लोष करण्यात आला. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पेढे - साखर वाटप करून फटाक्‍याची आतषबाजी केली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आज सकाळी तिन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मध्यवर्ती बसस्थानका जवळील डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोर जमले होते.

हेही वाचा - चोर आले, रे चोर आले, शेरेबाजीवर भाजपनेते म्हणाले, तुम्ही महाचोर 

भगवा झेंड्यासह राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे झेंडे एकत्र घेऊन कार्यकर्ते जमल्याचे चित्र प्रथमच पहायला मिळाले. जोरदार घोषणाबाजी करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. पुतळ्यासमोर येऊन "महाराष्ट्राचा बुलंदआवाज शरद पवार..शरद पवार', "आता कसं वाटतंय..गोड-गोड वाटतंय' अशा घोषणांनी बसस्थानक परिसर दणाणून सोडला. तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है  घोषणांनी चौक दणाणला... डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून मारूती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी फेरी काढली. उद्धव ठाकरे ' तुम आगे बढो..हम तुम्हारे साथ है', "जय जिजाऊ जय शिवराय' अशा घोषणांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. मारूती चौक परिसर देखील घोषणांनी दणाणून सोडला. 

हेही वाचा - विनय कोरेंनी महाआघाडीत येण्यासाठी यांच्यामार्फत सुरु केले प्रयत्न 

साखर-पेढे वाटप करून कार्यकर्त्यांचा जल्लोष...

साखर-पेढे वाटप करून जल्लोष केला. त्यानंतर फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, करीम मेस्त्री, सागर घोडके यांच्यासह शंभोराज काटकर, बिपीन कदम, इरफान मुल्ला, रवी खराडे, ज्योती आदाटे, प्रियांका तुपलोंढे, मनोज भिसे, विशाल हिप्परकर, प्रसाद रिसवडे, मयूर घोडके, संतोष पाटील,असिफ बावा आदी तिन्ही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिस बंदोबस्तही तैनात होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv sena, Congress, NCP Celebrates Victory In Sangli