Vidhan Sabha 2019 : पंढरपूर मतदारसंघातील शिवसैनिकांचा भाजपला इशारा!

ShivSena-BJP
ShivSena-BJP

मंगळवेढा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे अजून युतीसह उमेदवार निश्चित केले नसताना पंढरपूर मतदारसंघावर भाजपने आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अस्तित्वावर घाला घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष येताळा भगत यांनी व्यक्त केला.

शिवसेनेकडे हा मतदारसंघ असल्यामुळे शैला गोडसे यांनी गेल्या दोन वर्षांपासून विविध प्रश्नावर आंदोलनाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न उपस्थित केले होते. अशा परिस्थितीत जलसंधारणमंत्री आमदार तानाजी सावंत यांनी पाठिंबा दिल्याने त्या तालुक्याच्या प्रश्नासाठी आणखीनच नेटाने प्रयत्न करत आहेत. पण या मतदारसंघात भाजपने आपली ताकद वाढवत शिवसेनेकडून हा मतदारसंघ हिसकावून घ्यायचे प्रयत्न सुरू केले आहेत. 1995 च्या फार्मूल्यानुसार 2009 पर्यंत हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वबळावर लढले, त्यामध्ये भाजपाने ही जागा स्वाभिमानीला देऊ केली. शिवसेनेच्या उमेदवारांनी 40 हजारपेक्षा अधिक मते मिळवली. आजमितीला स्वाभिमानी पक्ष हा भाजपसोबत नाही, तर शिवसेनेने या मतदारसंघातील अनेक प्रश्नाला आंदोलनाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाजपपेक्षा शिवसेनेच्या वाढीस अधिक वाव मिळाला आहे, अशा परिस्थितीत गेल्या दोन वर्षापासून शिवसेनेतून उमेदवारी मिळावी म्हणून जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांनी मंगळवेढा उपसासिंचन योजनांचे प्रश्न मांडताना चांगला जनसंपर्क बनविला. 

याशिवाय, म्हैसाळ उपसा सिंचन निर्णयांमध्ये सात गावांचा समावेश करण्यासाठी जलसंधारणमंत्र्याच्या माध्यमातून प्रयत्न करून ती गावे समाविष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले. त्यामुळे दक्षिण भागांमध्ये जलसंधारण मंत्र्यांमुळे शिवसेनेचा प्रभाव अलीकडच्या काळामध्ये वाढीस लागला आहे. जलसंधारण मंत्र्यांनी पन्नास उमेदवारांची जबाबदारी घेतल्यामुळे तालुक्यातील शिवसैनिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

उमेदवारीसाठी घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये गोडसे या एकमेव महिला उमेदवार होत्या. मात्र, भाजपने ही जागा हिसकावून घेण्यासाठी वरच्या पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे ही जागा भाजपला देण्यास शिवसैनिकांतूनही विरोध होऊ लागला आहे. जर वरच्या पातळीवर काही खलबले झाली आणि सेनेने भाजपला ही जागा दिली, तर स्थानिक शिवसैनिक युती धर्म पाळणार का? अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com