Vidhan Sabha 2019 : शिवसेना खासदाराच्या मुलानेच केली बंडखोरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

यंदाच्या निवडणुकीत सेना-भाजपची स्थिती मजबूत दिसत होती. मात्र तिकीट वाटपानंतर दोन्ही पक्षांना बंडखोरीचं ग्रहण लागलं आहे.

मुंबई : यंदाच्या निवडणुकीत सेना-भाजपची स्थिती मजबूत दिसत होती. मात्र तिकीट वाटपानंतर दोन्ही पक्षांना बंडखोरीचं ग्रहण लागलं आहे.

तिकीट न मिळाल्याने शिवसेना-भाजपमध्ये नाराज झालेल्या काही नेत्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वाट धरली आहे.  तर काहींनी अपक्ष लढणं पसंत केलं. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. श्रीरामपूरमध्ये शिवसेनेच्या खासदार पुत्रानेच बंडखोरी केली आहे.

शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव चेतन लोखंडे यांनी पक्षाकडे श्रीरामपूर मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाने त्यांना डावलून नुकताच काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या भाऊसाहेब कांबळे यांना तिकीट दिलं. त्यामुळे नाराज झालेल्या चेतन लोखंडे यांनी श्रीरामपूरमधून अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena MP's son rebels against the party