केरळ पुरग्रस्तांसाठी शिवसेनेतर्फे मदतफेरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

नगर : केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महापौर सुरेखा कदम व माजीमंत्री शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली नगरमध्ये आज मदतफेरी काढण्यात आली होती. दिल्लीगेट येथे सकाळी अकरा वाजता या मदतफेरीस प्रारंभ झाला. दुपारी एकपर्यंत गोळा झालेल्या मदतीची उशिरापर्यंत मोजदाद सुरु होती. दिल्लीगेट येथून प्रारंभ झालेली ही मदतफेरी चितळेरस्ता, कापडबाजार व गंजबाजार परिसरातून नेण्यात आली. 

उपनेते राठोड व महापौर कदम यांच्यासह उपमहापौर अनिल बोरुडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, पक्षाचे नगरसेवक व कार्यकर्ते तसेच पक्षाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मदतफेरीत सहभागी झाल्या होत्या.

शिवसेनेच्या नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याकडील धनादेश व आज गोळा झालेली मदतीचा एकत्रित धनादेश देण्यात येणार आहेत. त्याशिवाय आणखी काही दात्यांनी शिवसेनेकडे मदत देण्याचे आश्‍वासन दिले असून, त्यांचीही रक्कम लवकरच मदतनिधीसाठी पाठविली जाईल. 

- दिलीप सातपुते, शिवसेना शहरप्रमुख. 

Web Title: Shiv Sena supports for Kerala flood victims