
शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत आज (शुक्रवार) कराड येथे आले होते. त्यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर शिवसैनिकांनी राऊत यांच्याशी संवाद साधला.
कराड :धर्मवीर चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा उभारण्यात येणाऱ्या पुतळ्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही शिवसेनेचे सचिव व उपनेते खासदार विनायक राऊत यांनी दिली. येथे उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याच्या कामासाठी शिवसेनेने मदत व सहकार्य करावे अशी मागणी शिवसैनिकांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली होती. त्यानूसार राऊत यांनी शिवसैनिकांना आश्वासन दिले.
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (शुक्रवार) सातारा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. श्री. ठाकरे हे माण, खटाव भागातील शिवारावर भेट देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. दरम्यान शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत आज (शुक्रवार) कराड येथे आले होते. त्यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले.
धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी
धर्मवीर संभाजी महाराज यांचा पुतळा येथील चौकात उभा करावा अशी मागणी शिवसेनेसह इतर संघटनांनी त्यांना केली. कराडमध्ये संभाजी चौकात शिवसेना सचिव राऊत यांचे स्वागत करण्यात आले. धर्मवीर संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालू. येथील पुतळा पूर्ण करण्यासाठी सहकार्य करु असे आश्वासन राऊत यांनी दिले.
हेही वाचा : विकृत मनाेवृत्तीनूच ' श्रद्धांजली ' चे कृत्य ; पालिका कर्मचाऱयांचे निवेदन
त्यावेळी माजी मंत्री विजय शिवतारे, सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, पुणे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, संजय मोहिते, कुलदीप कोंडे, उपतालुका प्रमुख काकासाहेब जाधव, संदिप गिट्टे, माजी शहरप्रमुख प्रमोद वेर्णेकर, उपशहरप्रमुख कुलदीप जाधव, ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र माने, सातारा जिल्हा वाहतुक संघटक ज्ञानेश्वर भोसले, बापू भिसे, दशरथ धोत्रे, निलेश पारखे, धैर्यशील माने यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
हेही वाचा : टाेलनाका चुकण्यासाठी येथून हाेतेय वाहतुक !