मुरगूड: शिवसेनेचा भगवा फडकला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

मुरगूड : नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी मुश्रीफ-पाटील आघाडीचे पाणीपत करत शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेने पालिकेवर भगवा फडकवला. त्यामुळे मुरगूडमध्ये पाच वर्षांनंतर पुन्हा सत्तांतर झाले.

निवडणुकीत माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, किरण गवाणकर यांच्यासह अनेक दिग्गजांना पराभव पत्करावा लागला. शिवसेनेने 18 पैकी नगराध्यक्षपदासह 12 जागांवर विजय मिळविला, तर राष्ट्रवादीला 2, अपक्षांना 2 आणि शिवाजी आघाडीला केवळ 1 जागा मिळाली. नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेखान जमादार 1877 मतांनी विजयी झाले. 

सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरवात झाली. पहिल्या चार प्रभागांच्या निकालात मंडलिक गटाचा बाल्लेकिल्ला असणाऱ्या प्रभागातून या गटाने विजयी सलामी दिली. त्यामध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेखान जमादार एक हजारपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर राहिले. 

पुढे त्यांचे मत्ताधिक्‍क्‍य वाढत राहिले. त्यानंतर तुकाराम चौक व गावभागातील मतमोजणीस प्रारंभ झाला. यामध्ये राष्ट्रवादीच्या रविराज परीट व संगीता चौगले आणि पाटील गटाच्या राहुल वंडकर यांचा विजय झाला. तसेच अपक्ष उमेदवार विशाल सूर्यवंशी व रेखाताई मांगले यांचाही विजय झाला, तर उर्वरीत सर्व जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली. यामध्ये माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांनी विद्यमान उपनगराध्यक्ष अजितसिंह पाटील यांचा 101 मतांनी, तर धनाजी गोधडे यांनी माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचा तब्बल 250 मतांनी पराभव केला. विरोधी पक्षनेते किरण गवाणकर व विद्यमान नगरसेवक दगडू शेणवी यांचा अपक्ष उमेदवार विशाल सूर्यवंशी यांनी पराभव केला. ते केवळ 3 मतांनी विजयी झाले, तर गौराबाई सोनुले या विद्यमान नगरसेविकांचा हेमलता लोकरे यांनी पराभव केला. 

विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी : 
शिवसेना- नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेखान जमादार (4861), सुप्रिया भाट (517), जयसिंग भोसले (376), संदीप कुलकुटकी (384), हेमलता लोकरे (531), वर्षाराणी मेंडके (619), नामदेवराव मेंडके (674), मारुती कांबळे (618), रंजना मंडलिक (644), रुपाली सणगर (748), 
अनुराधा राऊत (767),धनाजी गोधडे (759). 
राष्ट्रवादी कॉंग्रेस- रविराज परीट (529), संगीता चौगले (496). 
शिवाजी आघाडी- राहुल वंडकर (432). 
अपक्ष- विशाल सूर्यवंशी (354), रेखाताई मांगले (470).

Web Title: Shiv Sena wins Murgud Civic elections