म्हेत्रेंच्या मतदारसंघावर शिवाचार्यांचा दावा!

picture.jpg
picture.jpg

सोलापूर : माजी गृहराज्यमंत्री तथा कॅाग्रेसचे विद्यमान आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या अक्कलकोट या विधानसभा मतदारसंघावर नागणसूर येथील श्रीकंठ शिवाचार्य महास्वामींनी दावा केला असून, या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी असा अर्ज त्यांनी प्रदेश कॅंग्रेस समितीकडे केला आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत डॅा. जयसिद्धेश्वर महास्वामी यांना भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी जोरदार पाठपुरावा केला होता. 

प्रदेश कॅाग्रेस समितीने विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांनी सहा जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर ही मुदतवाढ मंगळवारपर्यंत होती. शिवाचार्यांच्या प्रतिनिधीने काही वेळापूर्वी काॅग्रेस भवनात येऊन प्रदेश काॅग्रेस समितीकडे अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले. अनामत भरायचा डीडीही दाखवला आणि तो अर्ज दाखल करण्यासाठी गेल्याचे कार्यालयातील कर्मचार्यांनी सांगितले.

म्हेत्रे यांनी अद्याप काॅग्रेसकडे अर्ज दाखल केला नाही. त्यांना भाजपमध्ये जाण्याचे वेध लागल्याची चर्चा आहे. मात्र त्यांना भाजपमध्ये उमेदवारी देऊ नये अन्यथा अक्कलकोट तालुका भाजपमुक्त करण्यात येईल असा कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, श्रीकंठ शिवाचार्य महाराजांनी अर्ज दाखल केल्याने अक्कलकोटमधील राजकीय धुरीणांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

 सोलापूर शहर उत्तर मतदारसंघासाठी सातलिंग शटगार यांनी अर्ज नेला. यापूर्वी प्रदेश प्रतिनिधी राजन कामत यांनी अर्ज नेला आणि प्रदेश कार्यालयात तो दाखलही केला आहे. जिल्हा कॉंग्रेस कार्यालयातून प्रशांत कांबळे, जाफरताज पाटील आणि रावसाहेब व्हनमाने (दक्षिण सोलापूर), शिवाजी काळुंगे (पंढरपूर), जीवनदत्त आरगडे, रमजान पठाण आणि डॉ. विजय साळुंके (बार्शी), महिबूब मुल्ला, अरुण जाधव व धर्मराज राठोड (अक्कलकोट), गौरव खरात आणि किशोर पवार (मोहोळ) यांचा समावेश आहे. 

विद्यमान आमदार प्रणिती शिंदे (शहर मध्य), भारत भालके (पंढरपूर) व सिद्धाराम म्हेत्रे (अक्कलकोट),  दिलीप माने (दक्षिण सोलापूर) यांनी अद्याप आपले अर्ज नेले नाहीत. तथापि ते थेट प्रदेश समितीकडे आपल्या उमेदवारीची मागणी करतील, अशी चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com