सोलापूर : माजी जिल्हा परिषद सदस्याची राजकारणातून अचानक निवृत्ती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

सोलापुरचे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कांबळे यांची राजकारणातुन निवृत्ती

माढा (सोलापूर) : सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती व सद्या माढा विधानसभेसाठी अपक्ष म्हणुन उमेदवारी दाखल केलेले शिवाजी कांबळे यांनी अर्ज माघार घेण्याची दिवशी निवडणुकीतून माघार घेत राजकारणातुन निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.

शिवाजी कांबळे हे आमदार बबनराव शिंदे यांच्या गटातून दोन वर्षांपुर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने बंडखोरी करत निवडणुकीला उभे होते. परंतु त्या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात राजकीय विरोधक म्हणून कार्यरत होते. व सध्याच्या माढा विधानसभेसाठी ते इच्छुक होते. गेली एक महिन्यापासुन ते कधी राष्ट्रवादी तर कधी महायुतीच्या संपर्कात असल्याच्या चर्चा होती. परंतु, ऐनवेळी त्यांनी अर्ज भरण्याच्या दिवशी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज काढण्याच्या दिवशी शेवटच्या काही क्षणात माढा तहसील कार्यालयात येऊन माढा विधानसभेच्या रिंगणातुन माघार घेतली.

माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कांबळे यावेळी म्हणाले की, बहुजनांना राजकारणात घ्यायचे नाही अशी शपथ माढा तालुक्यातील काही राजकारण्यांनी घेतली आहे. आमदार बबनराव शिंदे यांच्या सहकार्याने सोलापूर जिल्हा परिषदेचा 10 वर्ष सभापती होण्याचा लाभ मिळाला त्यामुळे गोरगरीबांची कामे करण्याची संधी मिळाली. कुणाच्याही दबावला बळी न पडता अंतकरणाला स्मरत मी अर्ज माघारी घेत आहे. जातीपातीच्या राजकारणाला कंटाळून मी राजकारणातुन निवृत्ती घेत असल्याची घोषणा त्यांनी माढा येथे पत्रकारांशी बोलताना केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivaji Kambles announce retirement from politics