सेवक संघाचे अचानक काम बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - फेस्टिव्हल ऍडव्हान्सकरिता दहा हजार रुपयांची रक्कम देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून शिवाजी विद्यापीठ सेवक संघाने आज अचानक काम बंद आंदोलन केले. मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारात सुमारे सव्वा पाचशे कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत मनमानी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, या घोषणेने इमारत दणाणून सोडली. दहा हजार रुपयांची ऍडव्हान्स वैयक्तिक ऍडव्हान्स रूपाने देण्याच्या निर्णयानंतर सेवक संघाने आंदोलन मागे घेतले.

विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना ईद, ख्रिसमस व दिवाळीकरिता दहा हजार रुपये फेस्टिव्हल ऍडव्हान्स दिला जातो. दिवाळीसाठी ही रक्कम वीस हजार रुपये करावी, या मागणीचे निवेदन सेवक संघाने कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे दिले होते. डॉ. शिंदे यांनी ऍडव्हान्स रकमेबाबतचा आढावा घेऊन निर्णय देण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार कर्मचाऱ्यांना पंधरा हजार रुपये ऍडव्हान्स देण्याचे मान्य करण्यात आले. ज्या कर्मचाऱ्यांनी ऍडव्हान्सकरिता दहा हजार रुपयांसाठी फॉर्म भरले होते. त्यांनी त्यात दुरुस्ती करत 15 हजार रुपयांची मागणी केली. सुमारे 83 कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनाची रक्कम लक्षात घेत दहा हजार रुपये ऍडव्हान्स देण्याची मागणी केली. त्याला सहायक कुलसचिव एन. एस. माने यांनी काल (ता. 20) आक्षेप घेत मागणी पंधरा हजार रुपयांची असताना दहा हजार रुपये देता कामा नये, अशी भूमिका घेतल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच दहा हजार रुपयांच्या स्वाक्षरीसाठी गेलेले व्हाऊचरही नाकारल्याचे त्यांनी सांगितले.

आज सकाळी सेवक संघाने लेखा विभागाच्या कामकाजात डॉ. माने लुडबूड करतातच कसे, या कारणावरून काम बंद आंदोलन केले. प्रवेशद्वारातच त्यांनी ठिय्या आंदोलन केले. या वेळी संघाचे अध्यक्ष बाबा सावंत यांनी कर्मचाऱ्यांचे हित प्रशासनाने लक्षात घ्यावे, अशी मागणी केली. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांना भेटले. डॉ. शिंदे यांनी व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयानुसार पंधरा हजार रुपये रक्कम देण्यात येते. त्यामुळे दहा हजार रुपये देता येत नसल्याचे सांगत तोडगा म्हणून वैयक्‍तिक ऍडव्हान्सखाली दहा हजार रुपये देणे शक्‍य असल्याचे स्पष्ट केले. वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले यांनी आंदोलनापूर्वी चर्चा व्हायला हवी, असे मत मांडले. अतुल एतावडेकर यांनी अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांबाबतची शेरेबाजी चुकीची असल्याचे सांगितले. शिष्टमंडळात उपाध्यक्ष अरुण वणिरे, राम तुपे, विष्णू खाडे, विशांत भोसले, सुरेश पाटील, अनिल साळोखे, मिलिंद भोसले, सदानंद माने, अजय आयरेकर, महेश सणगर, देवयानी यादव, सुनीता यादव, वर्षा माने यांचा समावेश होता.

Web Title: Shivaji University Employee Union agitation

टॅग्स