शिवाजी विद्यापीठाकडून वारकऱ्यांना पत्रावळ्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

कोल्हापूर - विठ्ठलनामाच्या जयघोषात तल्लीन होणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी प्लॅस्टिकमुक्तीचा जागर करणार आहेत. विद्यापीठाशी संलग्नित वीस महाविद्यालयांतील सुमारे सहाशे स्वयंसेवक दिंडीच्या मार्गावर पर्यावरणपूरक पत्रावळ्यांचे वाटप करणार आहेत. या पत्रावळ्या पुन्हा संकलित करून त्यांचे सेंद्रिय खत तयार केले जाणार आहे. विशेष म्हणजे या खताचे शेतकऱ्यांना मोफत वाटप होणार आहे. तेरा ते सतरा जुलैपर्यंत दिंडी मार्गावर विद्यापीठाच्या स्वयंसेवकांचे गट कार्यरत राहणार आहेत.

विद्यापीठाचे कोल्हापूर, सांगली, सातारा कार्यक्षेत्र आहे. संलग्नित एकूण 281 महाविद्यालयांपैकी 160 महाविद्यालयांत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आहेत. त्यांची संख्या 27 हजार इतकी आहे.

Web Title: shivaji university varkari patravali distribution