आघाडी शासनाकडूृन पाण्यात भ्रष्टाचार- शिवाजीराव नाईक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

शिराळा - आघाडी शासनाने 70 हजार कोटी खर्च करून ही पाणी न आडवता आपले खिसे भरण्याचा उद्योग केला. मात्र युती शासनाने जलयुक्‍त शिवार योजना राबवून शेतकऱ्यांचा फायदा केला असल्याचे मत आमदार शिवाजीराव नाईक यांनी व्यक्त केले. 

मेणी (ता. शिराळा) येथे प्रचार दौऱ्यात बोलत होते. यावेळी नाईक म्हणाले,""आघाडी शानाच्या भ्रष्टकारभारामुळे राज्याची मोठी पीछेहाट झाली आहे. टक्‍केवरीच्या नावाखाली राष्ट्रवादीची मंडळी मस्तावली आहे. अशा प्रवृत्तीला बाजूला सारा. विरोधकांनी काय विकास केला हे जनतेला सांगावे. केवळ टीका टिप्पणी करणे हाच त्यांचा एक उद्योग सुरू आहे.'' 

सुखदेव पाटील म्हणाले,""आमचे विरोधक प्रत्येक निवडणुकीत घरात उमेदवारी घेत आहेत. त्यांच्या या वागण्यामुळे अनेक लोक नाराज झाले असून त्याचा फायदा भाजपला होणार आहे.'' यावेळी सुभद्रा आटुगडे, साधू बेंगडे, खाशाबा पाटील, महादेव पाटील, आत्माराम सावंत, शिवाजी शिरसट, हरिबा शिरसट, खाशाबा शिरसट, शिवाजी आटुगडे, आनंदा सुतार, सचिन इंगळे, सुरेश बेंगडे, दिनकर पाटील उपस्थित होते.

Web Title: shivajirao naik shirala meeting