शिवानीला किताब हा साताऱ्याचा सन्मान

भुईंज - शिवानी जाधव हिचा सत्कार करताना डॉ. नीलिमा भोसले, राजेश स्वामी, डॉ. विलास परामणे, नयना जाधव व जीवन जाधव.
भुईंज - शिवानी जाधव हिचा सत्कार करताना डॉ. नीलिमा भोसले, राजेश स्वामी, डॉ. विलास परामणे, नयना जाधव व जीवन जाधव.

भुईंज - विश्वसुंदरी किताबाकडे वाटचाल करणाऱ्या शिवानीचे कौतुक करावयास मिळाले, हे भुईंज गावचे मोठे भाग्य आहे. त्याचबरोबर मिस इंडिया ग्रॅंड इंटरनॅशनल किताबाची मानकरी शिवानी जाधवने जागतिकस्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करावे हा सातारा जिल्ह्याचा मोठा सन्मान आहे, असे प्रतिपादन भारत सरकारचे उच्च आयुक्त राजेश स्वामी यांनी केले.

मर्ढे (ता. सातारा) येथील सुकन्या मिस इंडिया ग्रॅंड इंटरनॅशनल किताबाची मानकरी शिवानी जाधव हिचे आजोळ भुईंज असल्यामुळे गावातील विविध संस्था, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संयुक्त सहभागाने तिचा कौतुक सोहळा आयोजित केला होता. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी बोलत होते. अध्यक्षस्थानी महालक्ष्मी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. नीलिमा भोसले, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विलास परामणे, तालुकाध्यक्ष अरुण पवार, विश्वास पवार, सरपंच पुष्पा भोसले, उपसरपंच प्रशांत जाधवराव आदी उपस्थित होते. श्री. स्वामी म्हणाले, ‘‘शिवानी यापुढे जागतिक स्तरावर भारताचे विश्वसुंदरी स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व करेल, हा महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्याचा मोठा सन्मान आहे.’’ अध्यक्षस्थावरून नीलिमा भोसलेम्हणाल्या, ‘‘शिवानीचे कौतुक करताना तिने सर्वप्रथम पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. डोक्‍यावर मिस इंडियाचा मुकूट मिळविण्यासाठी तिने केलेले अथक परिश्रम, व्यायाम, आहारापेक्षा तिला कुटुंबापासून लांब राहावे लागले. तिने निसर्ग व पर्यावरणात केलेल्या सामाजिक कामामुळे तिला इथपर्यंत पोचता आले. तिच्या पुढच्या सर्व प्रवासाला भुईंज ग्रामस्थ्यांच्या वतीने शुभेच्छा.’’

सत्काराला उत्तर देताना शिवानी जाधव म्हणाली, ‘‘माझ्या यशात माझ्या आई- वडिलांच्या संस्कारांचा मोठा वाटा असून, भुईंज या माझ्या आजोळच्या लोकांनी दिलेले प्रेम व पाठबळ मला नक्कीच प्रेरणा देणारे आहे. हे कधीच विसरणार नाही.’’ या वेळी तिची आई नयना, वडील जीवन जाधव, आजोबा प्रकाश पवार, मामा राहुल पवार व रोहित पवार यांचा सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com