शिवेंद्रसिंहराजेंचा टोल नाका बंदचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 डिसेंबर 2019

सातारा - पुणे महामार्ग रस्त्यांवरील खड्डे तसेच दुरावस्था दूर करण्याचे आश्‍वासन देऊनही पुर्तता न झाल्याने शिवेंद्रसिंहराजे आक्रमक झाले आहेत. 

सातारा ः राष्ट्रीय महामार्गावरील प्रमुख रस्ते व सेवा रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने बुधवारपासून (ता. 18) आनेवाडी (जि. सातारा) येथील टोल नाका बंद करण्याचा पवित्रा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आहे.

अवश्य वाचा - रिलायन्स इन्फ्रा कंपनीकडे ६६ कोटींची थकबाकी

त्याबाबतचे निवेदन आमदार भोसले यांनी पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांना दिला आहे. या निवेदनात 16 नोव्हेंबरला एनएचएआय, पोलिस खाते, बांधकाम विभाग यांच्या अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती. या बैठकीत संबंधितांना जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्यासह सर्वांना आगामी 15 दिवसांत सातारा - पुणे रस्त्यांवरील खड्डे तसेच दुरावस्था दूर केली जाईल असे आश्‍वासन दिले होते.

हेही वाचा -  खेड-शिवापूर टोल नाक्याबाबत उद्या निर्णय

दरम्यान याबाबत कोणतीच उपाययोजना न झाल्याने अखेर आज (सोमवार) शिवेंद्रसिंहराजेंनी टोल नाका बंद आंदोलन छेडण्याचा निर्धार केला आहे.

नक्की वाचा - खेड-शिवापूर टोलनाका होणार बंद?; महिनाभरात सरकारकडे प्रस्ताव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivendrasinharaje Has Become Aggressive Due To Satara Pune National Highway Road Worst Condition