पुनवडीत शिवेंद्रसिंहराजेंची फटकेबाजी

सिद्धार्थ लाटकर
रविवार, 19 मे 2019

सातारा : शाळांना उन्हाळी सुटी लागल्याने गावा-गावांतील वाड्या वस्त्यांपासून ते शहरातील मोकळ्या जागा, मैदाने मुलांनी व्यापून गेली आहेत. कोण क्रिकेट खेळण्यात मग्न आहे तर कोण पोहायला शिकण्यात. घराघरात कॅरम, पत्त्यांचे डाव पडू लागले आहेत.

सुटीत मुलांबरोबर पालक ही आपल्या बालपणात रमून जातात. त्यांच्या बरोबर सापशिडे, नवा व्यापारपासून मैदानांवरील खेळ खेळत असतात. पुनवडी येथे काही कामा निमित्त आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे गेले होते. तेथील काम संपल्यानंतर त्यांना नजीकच्या मैदानात क्रिकेट खेळताना युवक दिसले. क्रिकेटचा डाव पाहून शिवेंद्रसिंहराजे त्यामध्ये सामील झाले. युवकांनी त्यांच्याकडे पहिली बॅटींग तुम्ही करा असा आग्रह धरला. त्यास होकार दिली. काही चेंडूचा अंदाज घेऊन नंतर शिवेंद्रसिंहराजेंनी फटकेबाजी करीत उपस्थितांची मने जिंकली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivendrasinhraje enjoyed cricket with youngsters