शिवजयंती एकाच दिवशी साजरी होणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

कोल्हापूर - मराठा क्रांती मोर्चाच्या विराट दर्शनानंतर मराठा समाजातील एकजूट यापुढेही कायम राहण्यासाठी फेब्रुवारीमध्ये (ता. 19) होणारी शिवजयंती एकाच दिवशी भव्य प्रमाणात साजरी करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. यासाठी स्वयंसेवकाच्या रूपात मराठा मोर्चासाठी काम केलेले मावळे, रणरागिणी आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या बैठकीचे नियोजन सुरू झाले आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने राज्यभर वादळ उठल्यानंतर मराठा समाजाची एकजूट पुढे आली. खेड्यापाड्यांत तालुका, जिल्हा पातळीवर विभागलेला समाज एकत्रित आला. औरंगाबादपासून सुरू झालेल्या मोर्चाची धग नागपूरपर्यंत कायम राहिली. कोल्हापूरसह परभणी, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग अन्य जिल्ह्यांत मराठा मोर्चाचे वादळ घोंघावले. ज्यांचा आदर्श आणि कणखर बाणा डोळ्यांसमोर ठेवून मोर्चे निघाले, त्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षीप्रमाणे 19 फेब्रुवारीला साजरी होत आहे. तत्कालीन कॉंग्रेस आघाडी सरकारने तारीख निश्‍चित केली. याचदिवशी मराठा समाजासह अन्य समाजानेही याचदिवशी शिवजयंती साजरी करावी, यासाठी सकल मराठा समाजाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

Web Title: shivjayanti celebration