अवघी सांगली झाली शिवमय !

अवघी सांगली झाली शिवमय !

सांगली - शिवजयंतीच्यानिमित्ताने अवघी सांगली सकाळपासूनच शिवमय होऊन गेली. काही मंडळांनी तर मध्यरात्रीच शिवजन्मोत्सव साजरा केला.

मंडई परिसरातील छत्रपतींच्या अश्‍वारुढ पुतळ्याला रोषणाई करण्यात आली आहे. आज सकाळपासून अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींनी मंडई परिसरात गर्दी केली होती. भगवे फेटे घातलेल्या तरुणांच्या रांगा लागल्या होत्या. "शिवाजी महाराज की जय'च्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

शहरभरात भगवे झेंडे घेऊन तरुणांचा जल्लोष सुरु होता. चौकाचौकात छत्रपतींच्या अर्धपुतळ्याला अभिवादन करण्यात येत होते. काही तरुण मंडळांनी ढोलताशांच्या गजरात शिवपुतळ्याच्या मिरवणुका काढल्या. विविध शाळांमध्येही शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. उत्सवात युवतींचा सहभागही लक्षणीय होता. शिवपुतळ्यासोबत सेल्फीचीही क्रेझ होती. 

शिवाजी क्रीडांगणावर शंभर कलाशिक्षकांनी एकत्रित येऊन सव्वा लाख चौरस फुटांची शिवाराज्याभिषेकाची रंगोळी रेखाटली आहे. ती पाहण्यासाठी सकाळपासूनच गर्दी झाली होती. मराठा क्रांती मोर्चातर्फेही शिवरायांना अभिवादन करण्यात आले.

जिल्हाभरातही रक्तदान, आरोग्य शिबीर, वक्तृत्व, रांगोळी स्पर्धा, गुणवंतांचे सत्कार, मिरवणुका असे अनेकविध उपक्रम झाले. बेडग, सलगरे, रांजणी, आळसंद आदी ठिकाणी शिवजयंती सप्ताह आयोजित केले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com