"शिवोत्सव-2017'साठी जय्यत तयारी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - तरुणाईच्या कलागुणांना वाव देणाऱ्या "शिवोत्सव-2017'साठी शिवाजी विद्यापीठातर्फे जय्यत तयार करण्यात आली आहे. देशभरातील विविध विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांचे येथे आगमन झाले असून महोत्सवाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांच्या रंगीत तालमीही रंगल्या. उद्या (ता. 10) शाहू छत्रपती महाराज, अभिनेता सचिन खेडेकर व भारतीय विद्यापीठ महासंघाचे (एआययू) सहसचिव डॉ. डेव्हिड सॅम्पसन यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी सहा वाजता महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे.

कोल्हापूर - तरुणाईच्या कलागुणांना वाव देणाऱ्या "शिवोत्सव-2017'साठी शिवाजी विद्यापीठातर्फे जय्यत तयार करण्यात आली आहे. देशभरातील विविध विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांचे येथे आगमन झाले असून महोत्सवाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांच्या रंगीत तालमीही रंगल्या. उद्या (ता. 10) शाहू छत्रपती महाराज, अभिनेता सचिन खेडेकर व भारतीय विद्यापीठ महासंघाचे (एआययू) सहसचिव डॉ. डेव्हिड सॅम्पसन यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी सहा वाजता महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. तत्पूर्वी दुपारी साडेतीन वाजता विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपासून "रोकडविरहित आर्थिक व्यवहार : भारतीय अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण' असा संदेश देत शोभायात्रेस प्रारंभ होणार आहे. 

केंद्र सरकारच्या क्रीडा व युवा मंत्रालय, भारतीय विद्यापीठ महासंघातर्फे (एआययू) 32 वा आंतर विद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सव शिवोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यासाठी काल (ता. 8) रात्रीपासूनच विविध विद्यापीठांचे विद्यार्थी विद्यापीठात येण्यास सुरवात झाली. आज दुपारपर्यंत 12 संघांनी नोंदणी केली होती. येथे आल्यानंतर विद्यार्थ्यांनी तत्काळ विविध सभागृहांची पाहणी करत रंगीत तालमीही केल्या. लोककला केंद्र कार्यक्रमासाठी सुसज्ज करण्यात आले असून तेथे साऊंड, आकर्षक लाईट व्यवस्था केली आहे. पाच हजार खुर्च्यांची मांडणीही करण्यात आली आहे. ऍनेक्‍स बिल्डिंगसमोर भोजनालयासाठी शामियाना उभारला आहे. 

बीसीयूडीचे संचालक डॉ. डी. आर. मोरे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, वित्त व लेखाधिकारी डॉ. अजित चौगुले यांनी लोककला केंद्र, भाषाभवन, नीलांबरी हॉल, मानव्यशास्त्र सभागृह, संगीत व नाट्यशास्त्र विभागाची सायंकाळी पाहणी केली. उद्या (ता. 10) दुपारी साडेतीन वाजता मुख्य इमारतीपासून शोभायात्रेस सुरवात होणार आहे. दूरशिक्षण विभाग, सायबर चौक, सागरमाळ, मालती अपार्टमेंट, एनसीसी ऑफिस ते पुन्हा लोककला केंद्र असा शोभायात्रेचा मार्ग राहील. सायंकाळी सहा वाजता महोत्सवाचे उद्‌घाटन झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठातर्फे महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. 

असे होतील कार्यक्रम : 
10 फेब्रुवारी - 9.30 ते 12.30 - नाव नोंदणी (लोककला केंद्र) 
- 11.00 ते 12.00 - संघ व्यवस्थापक बैठक (राजर्षी शाहू हॉल) 
- 3.00 ते 5.30 - शोभायात्रेस प्रारंभ 
- 6.00 ते 7.30 - महोत्सवाचे उद्‌घाटन 
- 7.30 ते 8.30 - सांस्कृतिक कार्यक्रम 

11 फेब्रुवारी 

* 9.30 
- प्रश्‍नमंजूषा (नीलांबरी हॉल) 
- क्‍लासिकल इन्स्ट्रुमेंट सोलो (संगीत व नाट्यशास्त्र विभाग) 
- पोस्टर मेकिंग (मानव्यशास्त्र सभागृह) 
* 10.00 
- वेस्टर्न सोलो (लोककला केंद्र) 
- एकांकिका (भाषा भवन) 
* 1.00 
- वेस्टर्न ग्रुप गीत (लोककला केंद्र) 
- वक्‍तृत्व (नीलांबरी हॉल) 
- कोलाज (मानव्यशास्त्र सभागृह) 
* 2.00 
- क्‍लासिक इन्स्ट्रुमेंटस सोलो (संगीत व नाट्यशास्त्र विभाग) 
* 4.00 
- फोक ऑर्केस्ट्रॉ (लोककला केंद्र) 

12 फेब्रुवारी 
* 9.30 
- वादविवाद (नीलांबरी हॉल) 
- इन्स्टॉलेशन (मानव्यशास्त्र सभागृह) 
- क्‍ले मॉडेलिंग (संगीत व नाट्यशास्त्र विभाग) 
* 10.00 
- लाइट व्होकल-इंडियन (लोककला केंद्र) 
- एकांकिका (भाषा भवन) 
- 1.00 
- प्रश्‍नमंजूषा अंतिम (नीलांबरी हॉल) 
- काटुर्निंग (मानव्यशास्त्र सभागृह) 
- समूहगीत-भारतीय (लोककला केंद्र) 
* 6.00 
- मूकनाट्य 

13 फेब्रुवारी 
* 9.30 
- स्किट (भाषा भवन) 
- स्पॉट फोटोग्राफी व स्पॉट पेंटिंग (मानव्यशास्त्र सभागृह) 
- रांगोळी (संगीत व नाट्यशास्त्र विभाग) 
* 10.00 
- क्‍लासिकल डान्स (लोककला केंद्र) 
* 3.00 
- फोक/ट्रायबल डान्स (लोककला केंद्र) 
* 5.00 
- मिमिक्री (भाषा भवन) 

14 फेब्रुवारी 
- 10.30 
- महोत्सवाचा समारोप 

Web Title: shivotsava -2017