सांगलीत वसंतदादा शेतकरी बॅंकेसमोर शिवसहकार सेनेतर्फे घंटानाद 

सांगलीत वसंतदादा शेतकरी बॅंकेसमोर शिवसहकार सेनेतर्फे घंटानाद 

सांगली -  अवसायनातील वसंतदादा शेतकरी बॅंकेची स्थावर मालमत्ता विक्री करू नका. बड्या कर्जदाराची व संचालकांची कर्जे वसुली करून मालमत्ता जप्त करावी, या मागणीसाठी शिव सहकार सेनेतर्फे आज मुख्य शाखेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. 

संपूर्ण देशभरात परिचित असलेल्या माजी मुख्यमंत्री वसंतदादांच्या नावाने असलेली बॅंक बंद पडली आहे. अवसायनातील बॅंक वाचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. गेली 9 वर्षे वसंतदादा बॅंक अवसायनात असून अवसायकांकडून म्हणावी तशी कर्ज वसुली होत नाही. बड्या राजकारणी मंडळींची कर्जे वसूल करण्यात अडथळे येत आहेत. अवसायकांवर दबाव येत आहे. बॅंकेच्या ठेवी 700 कोटींच्या आसपास होत्या. वितरित कर्ज 500 कोटींच्या आसपास आहे. आजअखेर केवळ दीडशे कोटीपर्यंत वसुली आहे. 350 कोटींची वसुली बाकी आहे. ती बड्या कर्जदारांची आहे.

संचालकांचे काही नातेवाईक आणि मित्र मंडळींचा समावेश आहे. त्यांची नावे जाहीर करावीत. बॅंकेच्या बाबतीत सहकार कायदा कलम 88 अंतर्गत नियुक्त अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा अहवाल आजअखेर सादर केला गेला नाही. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. सर्व संचालक मंडळाच्या मालमत्ता जप्त करून बनावट कर्जाची वसुली करावी. तत्कालीन अवसायक महेश कदम यांचीही चौकशी करावी, या मागणीसाठी बॅंकेच्या प्रवेशद्वारासमोर आज घंटानाद आंदोलन करण्यात आले. 

शिवसहकार सेनेचे संघटक प्रदीप बर्गे, धर्मेंद्र कोळी, अनिल शेटे, प्रभाकर कुरळपकर, जितेंद्र शहा, सुजाता इंगळे, सुनीता पाटील, राधिका जयस्वाल, मानसी शहा, स्वप्नाली कुरळपकर, बंडू मोरे, रामचंद्र वठारे, मुमताज मुजावर, प्रकाश लवटे, बशिद पठाण आदी पदाधिकारी व ठेवीदार आंदोलनात सहभागी होते. 
..............

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com