शिवसैनिकांनी निलेश राणेंच्या प्रतिमेला फासले काळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

वाडा - एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये माजी खासदार व स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी आनंद दिघे यांचा मृत्यु व बाळासाहेबांच्या जिवनाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज वाड्यात निलेश राणे यांच्या प्रतिमेला काळे फासून जोडे मारले. 

शिवसेना वाडा तालुका शाखेच्या वतीने वाडा शहरातील बसस्थानका समोर निलेश राणे यांच्या प्रतिमेला काळे फासून जोडे मारले. याप्रसंगी शिवसेना झिंदाबादच्या घोषणा देत राणे कुटूंबीयांचा धिक्कार करण्यात आला.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनिल पाटील, तालुका प्रमुख उमेश पटारे, वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष गीतांजली कोळेकर, उर्मिला पाटील, वर्षा गोळे, प्रकाश किणी, निलेश पाटील, नरेश चौधरी, तुषार यादव, भरत गायकवाड यांच्यासह अनेक शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते.   

Web Title: ShivSainik broke the image of Nilesh Rane