आरोग्य अधिकाऱ्यांना बडतर्फ करा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - शहरातील डेंगीच्या साथीकडे दुर्लक्ष करणाऱ्या आरोग्याधिकाऱ्यांना बडतर्फ करा, अशी मागणी शिवसेना शिष्टमंडळाने आज केली. महापालिकेच्या चौकात प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणा दिल्या. आयुक्तांच्या केबिनबाहेर आंदोलकांनी ठाण मांडले.

कोल्हापूर - शहरातील डेंगीच्या साथीकडे दुर्लक्ष करणाऱ्या आरोग्याधिकाऱ्यांना बडतर्फ करा, अशी मागणी शिवसेना शिष्टमंडळाने आज केली. महापालिकेच्या चौकात प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणा दिल्या. आयुक्तांच्या केबिनबाहेर आंदोलकांनी ठाण मांडले.

तीन महिन्यांपासून डेंगीच्या साथीने थैमान घातले आहे. १५ ते २० जणांचे बळी गेले आहेत. हजारावर नागरिकांना डेंगीची लागण झाली आहे. आरोग्य विभाग कागदोपत्री मोहीम राबविण्यापुरता मर्यादित राहिला आहे. आरोग्याधिकाऱ्यांची जबाबदारी असताना ते निष्क्रिय आहेत. डेंगीच्या साथीस त्यांना जबाबदार धरून आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांना तातडीने बडतर्फ करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. महापालिकेच्या मुख्य दरवाजाजवळ जोरदार निदर्शने केली.

डेंगीच्या साथीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलक थेट आयुक्तांच्या केबिनच्या दिशेने गेले. आयुक्तांच्या केबिनसमोर सर्वांनी ठाण मांडले. अखेर आरोग्याधिकारी डॉ. पाटील यांच्याशी चर्चा झाली. आंदोलकांनी डॉ. पाटील यांना धारेवर धरले.

खासगी रुग्णालये अहवाल पाठवत नाहीत, त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. संजय पवार, विजय देवणे, सुजित चव्हाण, दुर्गेश लिंग्रस, शिवाजीराव जाधव, शुभांगी पवार आदी आंदोलनात सहभागी झाले.

दृष्टिक्षेपात आंदोलन
 आयुक्तांच्या केबिनबाहेर ठाण
 तीन महिन्यांपासून थैमान 
 १५ ते २० जणांचे बळी 
 हजारांवर नागरिकांना लागण 
 डॉ. पाटील धारेवर

शहरात डेंगीसदृश आणखी १३ रुग्ण
शहरात डेंगीसदृश आणखी १३ रुग्ण आढळले. सुमारे एक हजार जणांना डेंगीची लागण झाली आहे. सरनाईक कॉलनी, शोले नगर, अहिल्याबाई होळकर नगर, नेहरूनगर, रायगड कॉलनी, जरगनगर, संभाजीनगर, लक्ष्मी वसाहत परिसर, कैलासगडची स्वारी मंदिर परिसर, आझाद चौक परिसर, राजेंद्रनगर, पांचरपोळ परिसर, भारतनगर, साळुंखे पार्क आदी भागात पाहणी झाली. ७८८ कुटुंबाच्या सर्व्हेत २५ कुटुंबात डेंगीच्या डासाच्या अळ्या आढळल्या.

Web Title: shivsena demand health officer suspend