शिवसेना पदाधिकाऱ्याला खुनात अटक

0crime_201_74.jpg
0crime_201_74.jpg

सांगली-कवठेमहंकाळ पंचायत समितीचे माजी सभापती आणि राष्ट्रवादीचे नेते मनोहर बापू पाटील (वय 50, हरोली, ता. कवठेमहांकाळ) यांचा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना जिल्हा उपप्रमुख दिनकर पाटील, अभिजीत पाटील, विनोद पाटील या तिघांना 24 तासात अटक करण्यात आली. 


अधिक महिती अशी, देशिंग-बोरगाव रस्त्यावर गुरूवारी एका शेतात ऊस तोड सुरू होती. सायंकाळी मनोहर पाटील तेथील कामगारांबरोबर चर्चा करत थांबले होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी अचानक येऊन त्यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. हल्ल्यात पाटील गंभीर जखमी होऊन खाली पडल्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. जखमी पाटील यांना स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने मिरज येथील मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचार सुरू असतानाच पाटील यांचा मृत्यू झाला. 


मनोहर पाटील यांचे मूळ गाव हरोली आहे. उपसरपंच म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेल्या पाटील यांनी 2017 मध्ये पंचायत समिती निवडणूक लढवली होती. सभापतीपदही त्यांनी भूषवले होते. महांकाली कारखान्याचे ते विद्यमान संचालक होते. तसेच नानासाहेब सगरे ऊस तोडणी वाहतूक संस्थेचे अध्यक्ष होते. 


मनोहर पाटील यांचा निर्घृण खून केल्याची बातमी गुरूवारी मध्यरात्री सर्वत्र पसरली. त्यानंतर आज सकाळपासून राजकीय वर्तुळात या खुनाची चर्चा होती. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची शक्‍यता असल्यामुळे कवठेमहांकाळ पोलिसांनी रात्रीपासूनच तपासाची चक्रे फिरवली. पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी आज सकाळीच कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यास भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. 


मनोहर यांचा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कवठेमहांकाळ पोलिसांनी शिवसेना जिल्हा उपप्रमुख दिनकर पाटील, अभिजीत पाटील, विनोद पाटील या तिघांना अटक केली. संशयित दिनकर पाटील याचे बंधू युवराज पाटील यांचा हरोली येथे तीन वर्षापूर्वी खून झाला होता. या खुनात मृत मनोहर यांचा हात असल्याचा संशय होता. या संशयातूनच मनोहर यांचा खून केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. 
 

दुसऱ्यांचा खुनाचा गुन्हा- 
काही वर्षापूर्वी पवनचक्कीच्या वादातून रामचंद्र जाधव यांचा कवठेमहांकाळमध्ये खून झाला होता. या खुनात दिनकर पाटील याला अटक केली होती. न्यायालयातून तो निर्दोष सुटला होता. त्यानंतर त्याचा भाऊ युवराज पाटील याचा खून झाला होता. त्यानंतर मनोहर पाटील यांचा गुरूवारी रात्री खून झाला. या खुनात दिनकर पाटीलला अटक झाली. दुसऱ्यांदा त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असून यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com