शिवसेना खासदार धैयशील मानेंनी काढले सरकारचे वाभाडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी आलमट्टी धरणातून विसर्ग वाढविण्याची मागणी केली आहे. माने यांनी म्हटले आहे, की कित्येक गावात गेलेल्या बोटी पंक्चर होत्या. कित्येक बोटींचे मॅकेनिज्म बिघडलेले पाहायला मिळत आहे. बोटीमध्ये बसताना लोक घाबरत आहेत. एकट्या कोल्हापुरात 20 बोटी काम करत होत्या.

कोल्हापूर - आलमट्टी धरणाच्या पाण्याचा विसर्ग त्या पद्धतीने सुरू नसल्याने खऱ्या अर्थाने कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील नागरिकांना मृत्यूच्या कळा सोसाव्या लागत आहेत. 2005 च्या तुलनेत या नैसर्गिक आपत्तीचा विचार केल्यास, बारा पट अधिक पाऊस पडला आहे. प्रसासनाच्या नियोजनात चूक आहे म्हणजे आहेच, अशी टीका शिवसेनेचे खासदार धैर्य़शील माने यांनीच केली. त्यामुळे माने यांनी सरकारला मदतकार्यावरून घरचा आहेर दिला आहे.

हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी आलमट्टी धरणातून विसर्ग वाढविण्याची मागणी केली आहे. माने यांनी म्हटले आहे, की कित्येक गावात गेलेल्या बोटी पंक्चर होत्या. कित्येक बोटींचे मॅकेनिज्म बिघडलेले पाहायला मिळत आहे. बोटीमध्ये बसताना लोक घाबरत आहेत. एकट्या कोल्हापुरात 20 बोटी काम करत होत्या. मात्र, शिरोळ तालुक्यात जिथं हजारो लोकं अडकलेत तिथं केवळ 20 बोटी. हा प्रशासनाचा मोठा हलगर्जीपणा आहे. मी स्वत:पासून, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्वांनी याची जबाबदारी स्विकारली पाहिजे. पण, प्रशासनाचे खऱ्या अर्थाने कान उघडण्याचे, कान उपटण्याची गरज आहे. 

आमचा एखादा जरी माणूस दगावला तरी, त्याला 100 टक्के आम्हीच कारणीभूत आहोत, असे म्हणत माने यांनी सरकारी यंत्रणाही फोल ठरत असल्याची खंत व्यक्त केली आहे. सध्या माणसं जगवणं, त्यांचा जीव वाचवणं हीच प्राथमिकता आहे. त्यानंतर, काय अनुदान द्यायचं, कसं सावरायचं हे पाहता येईल.अन्नधान्य संपलंय, केवळ धैर्यशील माने एकटा काहीही करू शकत नाही. प्रशासनाने गंभीर भूमिका घेणं गरजेच असून कलेक्टर ऑफिस शिरोळ तालुक्यात आणलं पाहिजे, असेही माने यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena mp Dhairyashil Mane criticize government on relief work