Video : खासदार ओमराजे निंबाळकर यांचा बाईकवर ट्रिपल सीट फिरून प्रचार

osmanabad
osmanabad

उस्मानाबाद : वाहतुकीचे नियम फक्त सामान्यांसाठीच असतात का? सोशल मीडियावरून हा प्रश्न विचारण्यात येत आहे, कारण उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर चक्क ट्रिपल सीट दुचाकीवरून प्रचार करत असल्याचा व्हिडिओ व्हारयल झाला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. उस्मानाबाद मतदारसंघातुन शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर यांचे समर्थक कैलास पाटील हे उमेदवार आहेत. पाटील यांच्यासाठी ओमराजे गावोगावी जाऊन प्रचार करीत आहेत. मात्र नुकतंच ओमराजे यांचं ट्रिपल सीट बसून बाईकवर प्रचार करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे

वाहतुकीचे नियम हे फक्त सामान्यांसाठीच असतात का, असा प्रश्न सध्या हा व्हिडीओ व्हायरल करत उस्मानाबाद जिल्ह्यातील सामान्य लोक विचारत आहेत. स्वतः खासदारांनी ट्रिपल सीट गाडीवर बसवून वाहतुकीचे नियम तोडल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com