सोलापूर‌ : बंडखोरी करणाऱ्या कोठेंसह तिघांची शिवसेनेतून हकालपट्टी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या महेश कोठे यांच्यासह जिल्ह्यातील तिघांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

सोलापूर‌ : विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या महेश कोठे यांच्यासह जिल्ह्यातील तिघांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

दरम्यान, करमाळा विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवार रश्मी बागल यांच्याविरोधातील अपक्ष उमेदवार, विद्यमान आमदार नारायण पाटील यांना पाठिंबा देणारे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, करमाळा शहरप्रमुख प्रवीण कटारिया यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

तसेच शहर मध्य विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करून शिवसेना उमेदवार दिलीप माने यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांचीही शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, असे शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी कळविले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त शुक्रवारी शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये प्रसिद्ध झाले आहे. दरम्यान, येत्या 14 ऑक्टोंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ShivSena party expulsion of three leader