अब की बार, नको गाजर सरकार... 

अब की बार, नको गाजर सरकार... 

सोलापूर : नवरात्रापाठोपाठ आता ऐन दिवाळीतही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळत आहे. सणासुदीत पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ शहरवासियांवर आल्याचा निषेध व्यक्‍त करत आज शिवसेनेच्या वतीने महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर प्रतिकात्मक फुसका बार पेटवून आंदोलन करण्यात आले. 

शिवसेनेच्या या आंदोलनावेळी 'पाणीपुरवठ्याचा फुसका बार, हे तर आहे फेकू सरकार..' , 'अब की बार, नको गाजर सरकार..', 'निष्क्रिय व गटबाजीत मश्‍गुल असणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा धिक्कार असो..', 'पाणी पुरवठा विस्कळीत करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो..' अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी विद्यार्थी सेनेचे संघटक महेश धाराशिवकर, शहरप्रमुख प्रताप चव्हाण, परिवहन सभापती तुकाराम मस्के, स्थापत्य समिती सभापती गुरुशांत धुत्तरगांवकर, कामगार नेते विष्णू कारमपुरी, विजय पुकाळे, लहू गायकवाड, संताजी भोळे, बाळासाहेब गायकवाड, शिवा ढोकळे, मनोज कामेगावकर, सचिन गंधुरे, मल्लू सातलगाव, विवेक इंगळे, उमेश बुक्कानुरे, प्रेम सातलगाव, जरगीस मुल्ला, मल्लू इनपे, निखिल हिप्परगी, दत्ता खलाटे, अतुल कदम, मिलन बोकेफोडे, रवी हक्के, गोवर्धन ग्यानपल्ली आदी उपस्थित होते. 

उजनी धरण भरलेलं असतानाही केवळ प्रशासन व सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचा फटका शहरवासियांना सोसावा लागत आहे. विस्कळीत पाणी पुरवठा तत्काळ सुरळीत करावा अन्यथा काही दिवसात यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल. 

- प्रताप चव्हाण, शहरप्रमुख

निवडणुकीपूर्वी नियमित पाणी पुरवठ्याच्या गोष्टी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून शहरवासियांना दोन दिवसाआडही पाणी देता आले नाही. दिवाळीत आणलेला महागडा फटाका फुसका निघावा तसाच हा अनुभव आहे. महापालिका प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करावा. 

- गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com