कल्लेश्‍वर वाघमोडे यांना शिवसेनेची मदत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - ऊस दराच्या प्रश्‍नावरून दोन दिवसांपूर्वी ऊस वाहतूक करणारा ट्रक आंदोलकांनी पेटवला. ट्रक बेचिराख झाला. त्यामुळे कल्लेश्‍वर वाघमोडे यांचे आर्थिक नुकसान झाले.

कोल्हापूर - ऊस दराच्या प्रश्‍नावरून दोन दिवसांपूर्वी ऊस वाहतूक करणारा ट्रक आंदोलकांनी पेटवला. ट्रक बेचिराख झाला. त्यामुळे कल्लेश्‍वर वाघमोडे यांचे आर्थिक नुकसान झाले.

सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांना आज शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांनी 21 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. अशी भडक आंदोलने करून शेतकऱ्यांना न्याय मिळतो का? असा प्रश्‍नही पवार यांनी केला.
न्याय मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलने झाली पाहिजेत. तो सर्वांचा हक्क आहे. पण आंदोलनावेळी कुणाचे तरी कुटुंब उद्‌ध्वस्त होऊ नये याची खबरदारी आंदोलकांनी घ्यावी. यापूर्वी अशाच आंदोलना वेळी पोलिस कर्मचारी मोहन पवार यांचा बळी गेला. दोन दिवसांपूर्वी वाघमोडे यांचा उसाने भरलेला ट्रक आंदोलकांनी पेटवून दिला. ट्रक जळून खाक झाल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले असून कुटुंब उघड्यावर पडण्याची वेळ आली आहे. आंदोलकांनी कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांना जाब विचारण्याचे धाडस संघटनेच्या कार्यकर्त्यांनी करावे. ज्यांचा संबंध नाही, त्यांच्यावर राग काढून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयाना उद्‌ध्वस्त करण्याचा अधिकार त्यांना नाही. असा अन्याय करून न्याय मिळवण्यात धन्यता मानू नये. कारखानदार आणि प्रशासकीय यंत्रणेलाच धारेवर धरून लोकशाही मार्गाने मागण्या मान्य करून घ्याव्यात. ऊस दराच्या आंदोलनात साखर कारखानदारांना आजपर्यंत कोणतीच झळ पोहोचलेली नाही. वाघमोडे यांना सामाजिक बांधिलकी म्हणून थोडा मदतीचा हात देण्यासाठी जिल्हा शिवसेनेतर्फे आर्थिक मदत देण्यात आली. अन्य संघटना आणि दानशुरांनी वाघमोडे यांना आर्थिक मदत करून त्यांचे कुटुंब सावरण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन संजय पवार यांनी केले आहे. या वेळी रवी चौगुले, सुजित चव्हाण, दुर्गेश लिंग्रस, शिवाजी जाधव, शैलेश पुणेकर, योगेश शिंदे, प्रवीण पालव, बापू कोळेकर भूषण पाटील उपस्थित होते.

Web Title: Shivsesna helps Kalleshwar Waghmode