कोल्हापूरजवळ शिवशाही बसला अपघात एक ठार

कोल्हापूरजवळ शिवशाही बसला अपघात एक ठार

पेठवडगाव - पुणे -बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर किणी टोल नाक्याजवळ शिवशाही बसचा अपघात झाला आहे. या अपघातात बसचा कंडेक्टर ठार तर २९ प्रवाशी जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री अडीचच्या दरम्यान घडली.

या अपघातामध्ये सागर एस परब (वय.30, रा.कालेली, ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग) हे ठार झाले आहेत तर चालक महंमद रियाज बागवान (वय.26,रा.आंबेडकर नगर,ता.चिकोडी,बेळगांव) जखमी आहेत. याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

बस (एम.एच.४७,वाय.४७१६) पुणे-निगडीहुन सांवतवाडीला जात होती. रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या ट्रकला (एच.आर.६९,बी.१६०३) पाठीमागुन जोरात धडक दिली. या अपघातात बसचा कंडेक्टरच्या बाजुचा चुराडा झाला. तर ट्रकला धडकेनंतक बाजुच्या खडयात पलटी झाला. बसमधील कंडेक्टर जागीच ठार झाला तर ड्रायव्हरसह २९ प्रवाशी जखमी झाले. जखमींना सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

अपघातानंतर बसमधून प्रवाशांना बाहेर येण्यास वाट नसल्याने अखेर काचा फोडून बाहेर पडावे लागले. 

शिवशाही बसला झालेल्या अपघातातील जखमींना पहाटे उपचारासाठी आणण्यात आले. प्रशासनाने तातडीने जखमींवर उपचारास सुरवात केली. अपघातचे वृत्त समजताच जखमींचे नातेवाईक व मित्रपरिवाराने सीपीआरमध्ये गर्दी केली होती. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले. 

अपघतातील जखमींची नांवे ः मिलींद मारुती पंडे (वय 33, रा. वाघापूर, भुदरगड), सविता बसवराज तुरवतमठ (वय 52), शिवराज बसवराज तुरवतमठ (वय 31), चंदन हितेश देवनाथ (वय 36), अरूण गुरगोंडा पाटील (वय 42, सर्व रा. गडहिंग्लज), पाडुरंग लक्ष्मण जाधव (वय 62, रा. आजरा), महेश बाबासाहेब संकपाळ (वय 31, रा. कागल), सूरज सखाराम आरळेकर (वय 80, रा. नागाळापार्क, कोल्हापूर), रोहित अनिल कुंभार (वय 29, रा. बापट कॅंम्प, कोल्हापूर), टोपाण्णा मारूती नाईक (वय 29, रा. तुर्केवाडी, चंदगड), अस्मिता अरविंद मुननकर (वय 51), अरविंद दत्तात्रय मुननकर (वय 52, दोघे रा. रा. कोलगाव, सावंतवाडी), संतोष राजाराम कटले (वय 26, रा. जैताळा, नागपूर), विवेक विलास कालेकर (वय 26, रा. पिंपरी चिंचवड, पुणे), इरफान इस्माईल सय्यद (वय 28, रा. सोलापूर), सिताराम पाडुरंग गावडे (वय 67, रा. विश्रांतवाडी, पुणे), सुनील तुकाराम मगर (वय 32, रा. आजरा), महमंद रियाज बागवान (वय 26, रा. बेळगाव, कर्नाटक), सुनील नारायण शिंदे (वय 45, आजरा). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com