सोलापूर : शिवशाही बसला अपघात; एकजण ठार तर ११ जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

सोलापूर : सोलापुर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शेटफळ येथे शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, ११ प्रवासी जखमी झाले आहेत.

जखमींवर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेटफळ फाट्याजवळ हा अपघात झाला. शिवशाही बस पुण्याहून सोलापूरला येत असताना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला.

दरम्यान, बसमध्ये एकूण १६ प्रवासी प्रवास करत होते. अपघात इतका भीषण होता की, बसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. जखमींसाठी प्रत्येकी एक हजार आणि मृताच्या कुटुंबीयांना १० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivshahi bus crash; One killed, 11 injured